uddhav Thackeray and imtiyaz jaleel saam tv
महाराष्ट्र

CM उद्धव ठाकरेंबद्दल मनात आणखी आदर वाढला, MIM खासदार जलील झाले इम्प्रेस

दोन दिवसांपासून शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी राजकीय वर्तुळात धुमाकूळ घातला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : दोन दिवसांपासून शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी राजकीय वर्तुळात धुमाकूळ घातला आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी केलेल्या बंडाच्या राजकारणामुळे शिवसेनेसह महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. कालपासून शिवसनेचे नेतेमंडळी शिंदे यांच्यासह आमदारांना मुंबईला येण्याची विनवणी करत आहेत. दरम्यान, आज सकाळपासून महाविकास आघाडीतील (mva government) घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षातील बड्या नेत्यांनी बैठका घेतल्या.

त्यानंतर अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून तमाम शिवसैनिकांना आणि महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या आमदारांना भावनिक साद घालून समोरा समोर येऊन चर्चा करण्यासाठी सांगितलं. याच पार्श्वभूमीवर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

इम्तियाज जलील यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये जलील म्हणाले, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या सच्चाईचे कौतुक आहे. शिवसेनेसोबत राजकारणात वैचारिक मतभेद असू शकतील, पण त्यांचे संबोधन ऐकून त्यांच्याबद्दलचा आदर आणखीनच वाढला. तुमच्या नम्रपणाने तुमच्या पक्षातील असंतुष्टांना जोरदार चपराक दिली आहे, अशा शब्दात जलील यांनी उद्धव ठाकरे यांच्या नम्रपणावर सूचक वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, शिवसेना आणि हिंदुत्व कदापी एकमेकांपासून दूर होऊ शकत नाही. कारण हिंदुत्व आमच्या श्वासात आहे, असा कानमंत्र बाळासाहेबांनी दिलेला आहे. २०१४ साली आपण लढलो तेव्हा आपण एकाकी लढलो. तेव्हा प्रतिकूल परिस्थिती असतानाही आपले ६३ आमदार निवडून आले. त्यानंतर जे आमदार मंत्री झाले ती शिवसेनाही बाळासाहेबांचीच आहे.

हिंदुत्वाबाबत विधीमंडळात बोलणारा मी कदाचीत पहिला मुख्यमंत्री असेल. पण मी असं काय केलंय, की शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांपासून दूर चालली आहे, असं तुम्हाला वाटतंय. काही आमदार सूरतला गेले, गुवाहटीला गेले. काहिंचे फोन येत आहेत. असं म्हणतानाच ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं, मी कोणत्याही संकटाला भीत नाही. मी आव्हानाला सामोरं जाणारं आहे.

यावेळी विधान परिषद निवडणुकीबाबत बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, विधान परिषद निवडणुकीच्या वेळी मी हॉटेलात गेलो आणि बघितलं तर काय चाललं होतं. कुणी बाथरुमला गेला तरी शंका, लघुशंका ठीक आहे पण ही कुठली शंका, असं म्हणतं आमदारांना टोला लगावला. तसंच ते पुढे म्हणाले, मी इच्छेपेक्षा जबाबदारीने काम करणारा आहे.

मी शिवसैनिकां दिलेलं वचन पूर्ण करणार. शरद पवार साहेबांनी सरकार स्थापन करताना बैठक घेतली तेव्हाच मुख्यमंत्रीबाबत ठरलं होतं. त्यावेळी शरद पवार साहेब म्हणाले, उद्धव जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल,शिवसेनेकडून तुम्ही नसाल तर चालणं कठीण आहे. त्यानंतर मी जिद्द केली. पवार आणि सोनिया गांधी यांनी माझ्यावर विश्वास टाकला. असे म्हणतानाच त्यांनी आमदारांना भावनिक आवाहन केलं.

एकाने जरी समोर येवून सांगितलं, तर मी राजीनामा देऊन वर्षावरुन मातोश्रीला येतो. जे आमदार गायब आहेत त्यांनी यावं आणि राजभवनावर राजीनाम्याचं पत्र घेवून जावं,कारण मी जाऊ शकत नाही, मला कोविड आहे. आज सकाळी कमलनाथ यांनी फोन केला, शरद पवारांनी केला. ते म्हणाले उद्धवजी मी तुमच्या सोबत आहे, असंही ते म्हणाले.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT