उद्धव ठाकरेंच्या फेसबुक लाईव्हनंतर राऊतांनी दिली तीन शब्दात प्रतिक्रिया

मुख्यमंत्री ठाकरे यांचं लाईव्ह संपताच शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विटरवर दोन शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.
Sanjay Raut
Sanjay Raut Saam Tv
Published On

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेनेची अंतर्गत धुसपूस चव्हाट्यावर आली आहे. एकनाथ शिंदे आणि काही बंडखोर आमदारांनी महाराष्ट्र सोडून गुवाहटीत मुक्काम ठोकला आहे. त्यामुळे राज्यात राजकीय घडमोडींना वेग आला आहे. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. या लाईव्हदरम्यान उद्धव ठाकरे (Uddhav Thackreray) यांनी बंडखोर आमदारांनी समोर येऊन सांगितलं तर या क्षणी मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे,असं आवाहन केलं आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांचं लाईव्ह संपताच शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विटरवर तीन शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. ( Maharashtra Political Crisis News In Marathi )

Sanjay Raut
Uddhav Thackeray : मी माझा मुक्काम वर्षावरून मातोश्रीवर हलवतो; उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारल्याने संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. संजय राऊत यांनी आज सकाळी सहकारी एकनाथ शिंदे यांच्यांशी फोनवरून संवाद साधला. फोनवरून संवाद साधल्यानंतर राऊतांनी एकनाथ शिंदे आणि शिवसेना आमदार स्वगृही परत येतील असा विश्वास व्यक्त केला.

मात्र, आज दुपारी एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली असून ती कायदेशीर अवैध असल्याचे सांगितले. त्यामुळे शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्यात संघर्ष सुरूच असल्याचे दिसत आहे. उद्धव ठाकरेंनी यांनीही फेसबुक लाईव्हकरून खदखद व्यक्त केली आहे. ठाकरेंच्या फेसबुक लाईव्हनंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊत यांनी ट्विट करत 'होय संघर्ष करणार' अशी प्रतिक्रिया दिली आहे.

...तर मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास तयार : उद्धव ठाकरे

शिवसेनेचे (Shivsena) ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ३३ शिवसेना आमदार गुवाहटीमध्ये गेले असल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेत खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुकवरुन संवाद साधला. बंड केलेल्या आमदारांनी मला समोर येऊन सांगा, मी मुख्यमंत्री पद सोडायला तयार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.

Edited By - Vishal Gangurde

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com