सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदे गटाने मागितली राज्यपालांची वेळ; संख्याबळ ऑनलाईन दाखवणार!

आमदारांचे संख्याबळ दाखवण्यासाठी शिंदे गटाने राज्यपालांची वेळ मागितली असल्याची माहिती आहे.
Balaji Kalyankar, Eknath Shinde, Maharashtra, Maharashtra Politics
Balaji Kalyankar, Eknath Shinde, Maharashtra, Maharashtra Politicssaam tv
Published On

मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह जवळपास 30 आमदारांनी पक्षाविरोधात बंड केलं आहे. या आमदारांना परत आणण्यासाठी शिवसेनेकडून (Shivsena) प्रयत्न सुरू आहे. अशातच, शिंदे गटाने आमदारांची ऑनलाईन परेड करण्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची वेळ मागितली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आपल्याकडे जे संख्याबळ आहे ते संख्याबळ आपण दाखवणार आहोत यासाठी शिंदे गटांनी राज्यपालांची वेळ मागितली असल्याची माहिती आहे. (Eknath Shinde Latest News)

Balaji Kalyankar, Eknath Shinde, Maharashtra, Maharashtra Politics
Uddhav Thackeray : मी माझा मुक्काम वर्षावरून मातोश्रीवर हलवतो; उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाचं निशाण फडकावल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात भूकंप आला. शिंदे यांच्या भूमिकेमुळे शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशातच एकीकडे शिवसेनेकडून या आमदारांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांची वेळ मागितली आहे. एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार सध्या आसामच्या गुवाहाटीमध्ये आहेत. त्यामुळे अशावेळी एकनाथ शिंदे आणि राज्यपालांचा ऑनलाईन संवाद होणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

Balaji Kalyankar, Eknath Shinde, Maharashtra, Maharashtra Politics
गद्दारांना कठोरात कठोर शिक्षा मिळायला हवी; औरंगाबादेत महिला शिवसैनिकांना अश्रू अनावर

एकनाथ शिंदे यांचं नरहरी झिरवळांना पत्र

विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनाही शिंदे यांनी एक पत्र लिहिले आहे. या पत्रावर शिवसेनेच्या एकूण 43 आमदारांच्या स्वाक्षरी आहेत. या पत्रात शिंदे यांनी शिवेसना प्रतोद सुनील प्रभू यांनी आमदारांना जारी केलेला व्हीव बेकायदेशीर असल्याचं म्हटलंय. इतकंच नाही तर शिवसेनेच्या मुख्य प्रतोदपदी भरत गोगावले यांची नियुक्ती केल्याचही त्यांनी आपल्या पत्रात सांगितलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com