रणजीत माजगावकर, साम प्रतिनिधी
Midnight Robbery in Kolhapur: कोल्हापुरातील मडीलगे येथे मध्यरात्री चोरट्यांनी डाव साधला अन् दरोडा घातला. गुरवांच्या घरातील लोक साखरझोपेत असताना चार जणांची डाव साधला. घरातील १४ तोळं सोनं आणि ९० हजार रूपये घेऊन ते पसार होणार होते, पण त्याच वेळी घरातील महिलेला जाग आली. तिने आरडाओरड केला. सुशांत गुरव उठले, त्यांना चोरांचा प्रतिकार केला. पण चोरट्यांनी त्यांना बेदम मारहाण केली. या हाणामारीत महिलेचा मृत्यू झाला. सुदैवांनी मुले बचावली. या घटनेमुळे कोल्हापूरमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या घटनेचा तपास केला जात आहे.
कुठे घडली घटना?
आजरा तालुक्यातील मडिलगे येथे आज रविवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास येथील सुशांत सुरेश गुरव यांच्या घरावर दरोडा पडला. दरोडेखोरांनी केलेल्या मराहाणीत सुशांत यांची पत्नी पुजा सुशांत गुरव (वय ३१ वर्षे) एक ठार झाले आहेत. तर सुशांत गुरव यांनाही दरोडेखोरांनी बेदम मारहाण केली आहे. सौ. गुरव यांच्या अंगावरील दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केलली आहे. या घटनेने मडिलगे पंचक्रोशी हादरून गेला आहे. सुशांत गुरव यांच्यावर आजरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नेमकं त्यावेळी काय घडलं?
याबाबत जखमी गुरव यांनी दिलेली प्राथमिक माहिती अशी, नेहमीप्रमाणे गुरव दांपत्य मुलांसोबत घरी झोपले असता रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास गुरव यांना जाग आली. त्यानंतर ते प्रातः विधीसाठी गेले. दरम्यान त्यांच्या पत्नीचा जोराने ओरडताना आवाज आला म्हणून त्यांनी पाहिले असता घराचे दोन्ही दरवाजे उघडे असून अज्ञात चौघेजण सौ. गुरव यांना मारहाण करताना दिसले. या प्रकारास त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही जबर मारहाण केली. पत्नीच्या अंगावरील दागिने व गुरव यांच्या गळ्यातील चेन व जवळच असणाऱ्या बॅगेतील रोख रक्कम व दागिने घेऊन दरोडेखोर पसार झाले.
बाहेर येऊन गुरव यांनी घराशेजारील इतर कुटुंबीयांना उठवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या सौ पूजा यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. गुरव यांच्या गोंधळाने घटनास्थळी आलेल्या इतर ग्रामस्थांनी गुरव यांना तातडीने आजरा ग्रामीण रुग्णालयात उपचारा करता दाखल केले आहे.
दिवसभर काही बेडशीट विक्रेते फेरीवाले संशयास्पद रीतीने गुरव दांपत्यासोबत वावरत होते. त्यांच्या घरीही बेडशीट विक्रीच्या निमित्याने ते आले होते. या फेरीवाल्यांवरच संशयाची सुई गुरव यांनी व्यक्त केली. ही घटना घडत असताना गुरव यांची दोन लहान मुले घटनास्थळीच होती. ती झोपेत असल्याने बचावली तर त्यांची आई बाहेरगावी पाहुण्यांकडे गेली असल्याने तीही बचावली.
सदर घटना घडल्यानंतर तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून श्वान पथकाला पाचारण करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस घटनेची अधिक माहिती घेत आहेत.१४ तोळे सोने व रोख ९० हजार लंपास झाल्याची शक्यता.
या दरोड्यामध्ये गुरव कुटुंबीयांचे पारंपारिक सुमारे १२ ते १४ तोळे सोन्याचे दागिने व रोख ९० हजार रुपये लंपास झाल्याची शक्यता गुरव यांनी व्यक्त केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.