Nashik : तरूणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं,अश्लील फोटो व्हायरल केले, विवाहित पोलिसाला बेड्या

Nashik police scandal : नाशिकमध्ये चंद्रकांत दळवी या पोलिसावर तरुणीशी अनैतिक संबंध ठेवून तिचे अश्लील फोटो व्हायरल केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून, निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या घटनेमुळे संतापाची लाट उसळली आहे.
Nashik cop arrested, obscene photo leak
Nashik cop arrested, obscene photo leakSaam TV News
Published On

तरबेज शेख, नाशिक प्रतिनिधी

Nashik cop arrested, obscene photo leak : रक्षकच भक्षक झाल्याचा प्रकार नाशिकमध्ये घडला आहे. एका पोलिसाने तरूणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. पोलीस हा स्वत: विवाहित होता. तरीही त्याने तरूणीसोबत अनैतिक संबंध ठेवले. त्या तरूणीला घरी घेऊन जाण्यास नकार दिला. तिला जीवे मारण्याची धमकीही दिली, या प्रकरणी पोलिसावर गुन्हा दाखल झाला. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. चंद्रकांत शंकर दळवी असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या प्रकारानंतर नाशिक पोलीस दलात खळबळ उडाली आहे. दळवी याने त्या तरूणीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते.

प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणीशी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या आणि तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दंगा नियंत्रण पथकातील पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. चंद्रकांत शंकर दळवी असे या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. इंदिरानगर येथील एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून, विवाहित असतानाही तिच्याशी वैदिक पद्धतीने लग्नाचा बनाव रचत, तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तिला घरी नेण्यास नकार देत फसवणूक केली. तसेच, तरुणीच्या पतीला गाडीखाली ठार मारण्याची धमकी देत तिचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप आहे.

Nashik cop arrested, obscene photo leak
Solapur MIDC : सोलापुरात मध्यरात्री मोठी दुर्घटना, एमआयडीसीत कारखाना जळून खाक, ३ जणांचा मृत्यू

या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात दळवीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिस आयुक्तांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी दळवी याला शासकीय सेवेतून निलंबित केले. या घटनेमुळे पोलिस खात्याच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, समाजात संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी तपास सुरू ठेवला असून, तरुणीला न्याय मिळवून देण्यासाठी कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे.

Nashik cop arrested, obscene photo leak
Mumbai-Thane : घोडबंदरच्या ट्रॅफिकला बाय बाय, मुंबई-ठाणे आणखी जवळ, अंतर २५ मिनिटांनी कमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com