Heartbreaking! ३ सेकंदात विधवा झाली, हार घालताच नवरदेवाचा मृत्यू, लग्न सोहळ्यात शोककळा

groom dies at wedding : कर्नाटकमधील जामखंडी येथे लग्नाच्या कार्यक्रमात हृदयद्रावक घटना घडली. हार घालून अवघ्या तीन सेकंदांत नवरदेवाचा मृत्यू झाला आणि नवरी विधवा झाली. २६ वर्षीय प्रवीणच्या मृत्यूनं संपूर्ण गावात शोककळा पसरली.
 Groom Dies Seconds After Tying Knot in Karnataka
Groom Dies Seconds After Tying Knot in KarnatakaSaam TV News
Published On

Groom Died of a heart attack : लग्नाचा मांडव बांधताना नको ते घडलं, लग्नकार्य सुरू होते, विधीही झाल्या. नवरदेवाने नवरीच्या गळ्यात हार घातला अन् त्याचवेळी त्याला हार्टअॅटक आला. अवघ्या तीन सेकंदात नवरी विधवा झाली. ज्या ठिकाणी आनंद होता, तिथे क्षणात शोककळा पसरली. कर्नाटकमधील बागलकोटमध्ये ही दुर्दैवी घटना घडली. ज्या मांडवात लग्नाचा उत्साह आणि आनंद होता त्याच मांडवावर क्षणात शोककळा पसरली. मुलीकडच्या मंडळींवर तर आभाळच कोसळले होते. आपल्या भावी आयुष्याची जोडीदारासोबत स्वप्ने रंगवणारी मुलगी ३ सेकंदात विधवा झाली.

कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील जामखंडी येथे एका लग्न सोहळ्यातील आनंद काही सेकंदात शोकात बदलला. लग्न पार पडताच वराला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. २६ वर्षीय वर प्रवीण याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. डॉक्टरांनी सांगितले की, प्रवीणचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. ज्या मांडवात लग्नाचा उत्साह होता त्याच मांडवात क्षणात शोककळा पसरली. आपल्या मुलाच्या लग्नाचे स्वप्न पाहणाऱ्या आई-बापाला त्याच्या अंत्ययात्रेची तयारी करावी लागली.

 Groom Dies Seconds After Tying Knot in Karnataka
Mumbai Coronavirus : 'तो' पुन्हा येतोय? मास्क लावायची तयारी ठेवा, मुंबईत कोरोना रूग्णांची संख्या वाढली

३ सेकंदातच नवरी विधवा

आपल्या भावी आयुष्याची जोडीदारासोबत स्वप्ने रंगवणारी मुलगी अवघ्या तीन सेकंदात विधवा झाली. प्रविणचा मृत्यू झाल्यामुळे लग्नाच्या ठिकाणी शोककळा पसरली. लग्नाच्या मंडपातून सासरी जाण्यापूर्वीच तिने आपला पती गमावला. या हृदयद्रावक घटनेने उपस्थित वऱ्हाडींच्या डोळ्यात अश्रू आले.

 Groom Dies Seconds After Tying Knot in Karnataka
Virat Kohli Bharat Ratna : ‘विराटला भारतरत्न द्या…’ किंग कोहलीसाठी CSK च्या दिग्गजाची मागणी

दु:खाचा डोंगर कोसळला -

प्रवीण लग्नाबद्दल खूप उत्साहित होता. आयुष्याची नवी सुरूवात थाटामाटात करण्याची तयारी त्याने केली होती. प्रत्येक विधी मोठ्या उत्साहाने पार पडला होता. प्रवीणने होणाऱ्या पत्नीसोबत प्री-वेडिंग शूटही केले होते. आता हे व्हिडिओ पाहून दोन्ही कुटुंबियांचे दु:ख आणखी वाढेल. जामखंडी गावात घडलेली ही घटना सध्या कर्नाटक राज्यात चर्चेचा विषय बनली आहे. वयाच्या २६व्या वर्षी प्रवीणने अखेरचा श्वास घेतला. तर अवघ्या तीन सेकंदातच नवरी विधवा झाली, ही घटना प्रवीणच्या कुटुंबीयांसाठीच नव्हे, तर संपूर्ण गावासाठी धक्कादायक ठरली आहे.

 Groom Dies Seconds After Tying Knot in Karnataka
Nashik : तरूणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं,अश्लील फोटो व्हायरल केले, विवाहित पोलिसाला बेड्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com