Maval News Saam tv
महाराष्ट्र

Bhamchandra Dongar : संत तुकाराम महाराजांच्या तपोभूमीला भूमाफियांचा विळखा; भामचंद्र डोंगर मुक्तीचा पुन्हा एकदा एल्गार

Maval News : भामचंद्र मुक्तीची रणनीती ठरविण्यासाठी एक मीटिंग पुणे येथे घेण्यात आली. यावेळी वारकरी संप्रदायातील अनेक मान्यवर उपस्थित होते. संत तुकाराम महाराज यांची तपोभूमी म्हणून भामचंद्र डोंगर ओळखला जातो

दिलीप कांबळे

मावळ : जगद्गुरु तुकोबाराय यांची तपोभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मावळातील भामचंद्र डोंगराला बिल्डर, भूमाफिया यांनी विळखा घातला आहे. या भूमाफियांच्या मगरमिठीतून भामचंद्र डोंगराला मुक्त करण्यासाठी वारकरी आणि तुकाराम महाराज यांच्या भक्तांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. 

भामचंद्र मुक्तीची रणनीती ठरविण्यासाठी एक मीटिंग पुणे (Pune) येथे घेण्यात आली. यावेळी वारकरी संप्रदायातील अनेक मान्यवर उपस्थित होते. संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) यांची तपोभूमी म्हणून भामचंद्र डोंगर ओळखला जातो. याच डोंगरावर तुकाराम महाराज यांना साक्षात्कार झाला. आजही शेकडो साधक साधना, अभ्यास करण्यासाठी भामचंद्रावर राहत आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून या तपोभूमीला बिल्डर आणि भूमाफियांनी पोखरायला सुरुवात केली आहे. त्या विरोधात मधुसूदन महाराज यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला यश आले आणि २०११ साली शासनाने अधिसूचना काढून हा भाग संरक्षित करण्यात आला.

मोठे जनआंदोलन उभारणार 

दरम्यान अतिक्रमण काही काळ थांबले. परंतु छुप्या पद्धतीने डोंगर पोखरण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आणि आतापर्यंत झालेले सर्व अतिक्रमण हाटविण्यासाठी पुन्हा विशाल (Warkari) वारकरी आंदोलन पुकारण्याचा निर्णय पुणे येथे झालेल्या मीटिंगमध्ये घेण्यात आला. यावेळी हभप मधुसूदन महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मीटिंगला महाराष्ट्रातील ज्येष्ठ कीर्तनकार, सामाजिक कार्यकर्ते, तुकोबाराय भक्त उपस्थित होते. लवकरच एक मोठे जनआंदोलन उभे करण्याचा निर्णय या मीटिंगमध्ये घेण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

65 वर्षे जुना कायदा बदलण्याच्या तयारीत मोदी सरकार, खासदार अपात्रता कायद्याच्या जागी नवीन कायदा आणण्याची केंद्राची योजना

Maharashtra News Live Updates: पुणे शहरासह जिल्ह्यात आज अनेक नेत्यांच्या सभा

Shani Margi 2024: शनी देव कुंभ राशीत मार्गस्थ; 'या' राशींसमोर संकटं येणार, आर्थिक घडी विस्कटणार

Ayushman Bharat Yojana: ५ लाखांपर्यंत मोफत उपचार, कोणत्या हॉस्पिटलमध्ये घेता येणार उपचार; पाहा लिस्ट

Sharad Pawar vs Ajit Pawar : साहेब की दादा, बारामतीमध्ये आज कुणाचा आव्वाज घुमणार?

SCROLL FOR NEXT