Sushma Andhare
Sushma Andhare Saam tv
महाराष्ट्र

Sushma Andhare News : नारायण राणे मानसिकरित्या आजारी, उपचार घेऊन लवकर बरे व्हावे; सुषमा अंधारे यांचा नारायण राणेंवर निशाणा

दिलीप कांबळे

मावळ : नारायण राणे हे मानसिक आजारी आहेत. आजारी माणस तापात बडबडतात. त्यामुळे त्यांचा बोलणं मनावर घेऊ नये. माझ्या भाच्यानी देखील प्रचारातून थोडा वेळ काढून (Narayan Rane) नारायण राणेंना एका चांगल्या डॉक्टरांना उपचारासाठी दाखवावं. तापात माणसं बडबडतात. त्या आजारात नारायण राणे यांच्या मेंदूवर देखील परिणाम झालेला असू शकतो; असा आरोप शिवसेनेच्या नेत्या (Sushma Andhare) सुषमा अंधारे यांनी केला आहे. (Live Marathi News)

नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे वेडा आणि सायकीक केस आहे. आमच्या सुपाऱ्या दहशतवाद्याना देत असल्याचे वक्तव्य केले होते. यावर बोलताना शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिउत्तर दिले आहे. (Maval) मावळमध्ये महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचारासाठी देहूरोडमध्ये आल्या होत्या. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी त्या बोलत होत्या. दरम्यान अंधारे यानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने धम्मभूमी बुद्ध विहारात जाऊन बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जितना बडा भ्रष्टाचार उतनी बडी भाजपा मे ग्रँड एन्ट्री ही मोदी की गॅरंटी आहे. आज (BJP) भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि (Shiv Sena) शिवसेना यातल्या भ्रष्टाचाऱ्यांना घेऊन भाजपने कचरा आपल्याकडे डम्प केला ही मोदींची गॅरंटी आहे. आज मोदींनी वन नेशन वन इलेक्शन म्हणत उघड उघड संविधान बदलण्याची भाषा केली आहे. आज जनता बाबासाहेबांच्या जन्मदिनी प्रण करतील की बाबासाहेबांच्या संविधानाच्या विरोधात जाणाऱ्या लोकांना क्षमा करणार नाही. भाजपने खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे हे करू नये. मागच्या वेळी दिलेल्या संकल्प पत्रात केलेल्या घोषणांचे काय झाले, यावर पहिले बोलावं अस वक्तव्य शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलं आहे..

प्रत्येक पक्षाला युती करायची की नाही याचा अधिकार आहे. आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्याकडे मैत्रीचा हात पुढे केला होता. तो आजही आहे. आंबेडकरांनी ते घ्यायचं की नाही घ्यायचं हा त्यांचा प्रश्न आहे. उगाच हा पक्ष A टीम तो पक्ष B टीम करण्यापेक्षा आमचा पक्ष या सर्व स्पर्धेत कसा अव्वल राहील याकडे आमचं लक्ष जास्त आहे. भाजपचा आजचा जाहीरनामा हा भाजप विरोधी आहे की संविधानाला मानणारा मतदार कधीही विभाजन करून भाजपला त्याचा फायदा होईल असं करणार नाही; असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संभाजीनगर : गर्भपात रॅकेटचा केंद्रबिंदू भोकरदन; डाॅक्टरांसह औषध व्यावसायिक शहरातून गायब

Malegaon News: साडेतीन तासांत एकही गावकरी मतदान केंद्राकडे फिरकला नाही, मालेगावमधील मेव्हणे गावात नेमकं काय झालं?

Marriage Tips: लग्नानंतर नववधूने हातात किती हिरव्या बांगड्या घालाव्यात?

Grandfather Dance Video: नाद ओ बाकी काय नाय! ढोलकीचा आवाज कानी पडताच आजोबांनी धरला लावाणीवर ठेका; VIRAL VIDEO

Manipur Violence: मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; लष्कर आणि कुकी दहशतवाद्यांमध्ये २ तासांची चकमक, ७५ महिलांची सुटका

SCROLL FOR NEXT