Kalyan kale
Kalyan kaleSaam tv

Kalyan kale News : पायाखालची वाळू सरकायला लागल्याने विकासावर बोलायला लागेल; कल्याण काळे यांची भाजपवर निशाणा

Jalna News : गेल्या ५० ते ६० वर्षात काँग्रेसने विकास आणि सर्व धर्म समभाव या मुद्द्यावर मत मागितली. मात्र भाजपाला आता जाग आली असं म्हणत काळे यांनी भारतीय जनता पक्षावर टीका
Published on

जालना : ज्याला अहंकार होतो तो नक्कीच हरतो, आम्हाला अहंकार झालेला नाही. त्यांना अहंकार झाला आहे; असं म्हणत जालना लोकसभेचे (Mahavikas Aaghadi) महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली. तसेच भाजपची नेहमीची संभ्रम निर्माण करण्याची पद्धत असून मतदार राजा आम्हाला निवडून देत परिवर्तन घडवेल; असा विश्वास देखील डॉ. काळे यांनी बोलून दाखवला. (Latest Marathi News)

Kalyan kale
Shirpur Accident : मजुरांनी भरलेली गाडी उलटली; मुलीचा मृत्यू, १९ जखमी

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त (Jalna) जालन्यात आले असता डॉ. कल्याण काळे यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. गेल्या ५० ते ६० वर्षात काँग्रेसने विकास आणि सर्व धर्म समभाव या मुद्द्यावर मत मागितली. मात्र (BJP) भाजपाला आता जाग आली असं म्हणत काळे यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Kalyan kale
Jamner Crime News : पत्नी व अकरा महिन्याच्या चिमुकलीची हत्या; गावी येत पतीनेही संपविले जीवन

त्यांच्या पायाखालची वाळू आता सरकायला लागली असल्याने ते विकासावर बोलायला लागेल असल्याची टीका डॉ. कल्याण काळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्ध केलेल्या भाजपाच्या जाहीर नाम्यावर केली. ही कुस्ती नसून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला दिलेला अधिकार आम्ही बजावण्याचे काम करत असून मतदारराजा आम्हाला निवडून देईल असा विश्वास काळे यांनी बोलून दाखवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com