Maval News Saam tv
महाराष्ट्र

Maval News : कुंडमळ्यातील इंद्रायणी नदीने ओलांडली धोक्याची पातळी; पर्यटकांसाठी येण्यास मनाई, पोलिसांचा पहारा

दिलीप कांबळे

मावळ : मावळ तालुक्यात मुसळधार पावसाने कुंडमळा या धबधब्यावरील इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे पिंपरी- चिंचवड पोलिसांकडून पर्यटकांना येथे पर्यटन न करण्याचा सूचना फलक लावण्यात आले होता. याठिकाणी पर्यटकांसाठी येण्यास मनाई करण्यात आली आहे. 

कुंडमळा परिसराला पुणेकरांची खास पसंती आहे. पुण्यापासून अगदी जवळ असल्याने पिंपरी- चिंचवडकर (Pimpri chinchwad) पर्यटक ही येथे जातात. मात्र पर्यटन करताना येथील पर्यटकांना पाण्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अनेकांनी आपले जीव गमावले आहेत. तर येथील स्थानिक जीव रक्षकांनी आपला जीव धोक्यात घालून शेकडो पर्यटकांचे प्राण वाचविले आहेत. पोलिसांनी सोबत येथील जीवरक्षक पर्यटकांना वारंवार धोक्याच्या सूचना करत असतात; तरी देखील पर्यटक ऐकण्यास तयार नसतात. 

पोलिसांनी लावले फलक 

लोणावळ्याच्या (Lonavala) धबधब्यावर पर्यटनासाठी आलेले एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेनंतर पर्यटकांनी अजूनही बोध घेतला नाही. तरीही पर्यटक याकडे दुर्लक्ष करत असल्याचं चित्र दिसून येत होतं. एमआयडीसी (Police) पोलिसांनी आता थेट जिथं धोकादायक पर्यटन करण्यात येते, तिथेच थेट सुरक्षित पट्ट्या बांधण्यात आल्या असून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तळेगांव दाभाडे पोलीस आणि आंबी एमआयडीसी पोलीस येथे पहारा देत आहे. सर्व कुंडमळा परिसरावर पोलिसांची तीक्ष्ण नजर असून, धोक्याचा इशारा असलेला फलक ही येथे लावण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit sharma: होय..माझा 'तो' निर्णय चुकला! रोहित शर्माने का मागितली माफी?

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

Poha Chivda: दिवाळीसाठी घरी खमंग अन् कुरकुरीत बनवा पोह्यांचा चिवडा

SCROLL FOR NEXT