Ulhasnagar News : कर थकबाकीधारकांना उल्हासनगरमध्ये 'अभय'; १०० टक्के विलंब शुल्क होणार माफ

Ulhasnagar News : उल्हासनगर पालिका आयुक्त अजीज शेख यांनी मालमत्ता व पाणीपट्टी कर धकबाकीधारकांना दिलासा देण्यासाठी २२ ते २६ जुलैदरम्यान अभय योजना जाहीर केली आहे
Ulhasnagar Corporation
Ulhasnagar CorporationSaam tv
Published On

अंबरनाथ : मालमत्ता व पाणीपट्टी कर न भरणाऱ्यांना विलंब शुल्काची आकारणी केली जात असते. यानंतर देखील अनेक थकबाकीदार कराची थकीत रक्कम भरण्यास तयार नसतात. यासाठी उल्हासनगर पालिकेने थकबाकीदारांना लावलेले विलंब शुल्क शंभर टक्के माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे उल्हासनगरमधील थकबाकीदारांना अभय दिले जाणार आहे. 

Ulhasnagar Corporation
Dengue Positive : अमरावती जिल्ह्यात २७ डेंग्यूचे पॉझिटिव्ह रुग्ण; संशयितांची संख्या शंभरच्यावर

उल्हासनगर (Ulhasnagar) पालिका आयुक्त अजीज शेख यांनी मालमत्ता व पाणीपट्टी कर धकबाकीधारकांना दिलासा देण्यासाठी २२ ते २६ जुलैदरम्यान अभय योजना जाहीर केली आहे. या अभय योजनेंतर्गत मालमत्ता व पाणीपट्टी करावरील १०० टक्के विलंब शुल्क माफ होणार असून नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे. चारच दिवसासाठी हि अभय योजना असल्याने जे थकबाकीदार या चार दिवसात थकीत कराची रक्कम भरण्यास जातील त्यांना विलंब शुल्क माफी दिली जाणार आहे. 

Ulhasnagar Corporation
Palghar Zp School : पाच वर्गांसाठी एकच शिक्षक; पालघर जिल्हा परिषद शाळेतील २६०० शिक्षकांची पद रिक्त

९३६ कोटींचा थकीत कर 

उल्हासनगरात (Ulhasnagar Municipal Corporation) एकूण एक लाख ८३ हजार १३८ करमूल्य मालमत्ता असून त्यांच्याकडे ९३६ कोटी ९९ लाख ९२ हजार ४९८ रुपयांची थकबाकी आहे. एकूण ९३६ कोटींची थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने कंबर कसली आहे. गेल्या आठवड्यात थकबाकीधारक १४ मालमत्ताधारकांना नोटिसा देऊन जप्तीचा इशारा देखील दिला होता. त्यांना देखील या अभय योजनेत भाग घेता येणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com