Dengue Positive
Dengue PositiveSaam tv

Dengue Positive : अमरावती जिल्ह्यात २७ डेंग्यूचे पॉझिटिव्ह रुग्ण; संशयितांची संख्या शंभरच्यावर

Amravati News : अमरावती जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्यासोबत अनेक आजारांचे प्रमाण देखील वाढले आहे. जिल्ह्यात डेंग्यूची साथ पसरत असून अनेकजण बाधित झाले आहेत
Published on

अमर घटारे 
अमरावती
: पावसाळा सुरु झाला आणि साथरोगांचा फैलाव होण्यास सुरवात झाली आहे. यात सुरवातीपासूनच डेंग्यू व मलेरियाचे रुग्ण आढळून येत आहेत. यात राज्यातील नाशिक व अमरावती जिल्ह्यात डेंग्यूची साथ मोठ्या प्रमाणात पसरत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. यात अमरावती जिल्ह्यात मागील १७ दिवसात तब्बल २७ डेंग्यूचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे आरोग्य विभाग खळबळून जागे झाले आहे. 

Dengue Positive
Shahada Heavy Rain : मुसळधार पावसाने शहादा न्यायालयाच्या आवारात तलावाचे स्वरूप; न्यायालयाचे कामकाज ठप्प

अमरावती (Amravati) जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्यासोबत अनेक आजारांचे प्रमाण देखील वाढले आहे. जिल्ह्यात डेंग्यूची साथ पसरत असून अनेकजण बाधित झाले आहेत. दरम्यान जिल्ह्यात मागील १७ दिवसात १०७ संशयित रुग्णांमध्ये २७ रुग्णांचा डेंगू (Dengue) अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तर यामध्ये आठ चिकनगुनियाचे देखील पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. या शिवाय जिल्ह्यात थंडी, ताप, व्हायरल इंफेक्शनच्या रुग्णांची संख्या देखील मोठी असल्याने रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. 

Dengue Positive
Raver Accident : लग्न समारंभातून परतताना काळाचा घाला; बसची दुचाकीला जोरदार धडक, महिलेचा मृत्यू

आरोग्य विभाग सतर्क 

जिल्ह्यात डेंग्यू व चिकुनगुनियाचे रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणा (Health department) खळबळून जागे झाले आहे. ज्या ठिकाणी रुग्ण आढळून येत आहेत. तेथे लागलीच उपाययोजना केली जात आहे. तसेच नागरिकांनी कीटकजन्य आजारापासून दूर राहण्यासाठी कोरडा दिवस पळावा व घराजवळ पाण्याचे डबके साचू न देता घरातील खिडक्यांना जाळी बसवण्याचे आव्हान सुद्धा आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com