Sambhajinagar News : समृद्धी महामार्गावर फिल्मी स्टाइल थरार, कारला धडक दिली, पोलिसांनी पाठलाग केला; भरधाव ट्रकमध्ये सापडलं भलतंच घबाड

Sambhajinagar News : नागपूरहून समृद्धी महामार्गावरून रात्री निघालेला ट्रक रात्री दहा वाजेच्या सुमारास मेहकर नजीक आला असता एका कारला धडक दिली.
Sambhajinagar News
Sambhajinagar NewsSaam tv
Published On

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीत एका कारला धडक देऊन भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकचा पाठलाग करून संभाजीनगर जिल्ह्याच्या हद्दीत पकडण्यात आले. या नंतर गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये ६४ लाखाचा गुटखा आढळून आला आहे. फुलंब्री पोलिस ठाण्यात ट्रकसह गुटखा जप्त करण्यात आला आहे. 

Sambhajinagar News
Dengue Positive : अमरावती जिल्ह्यात २७ डेंग्यूचे पॉझिटिव्ह रुग्ण; संशयितांची संख्या शंभरच्यावर

नागपूरहून समृद्धी महामार्गावरून (Samruddhi Highway) रात्री निघालेला ट्रक रात्री दहा वाजेच्या सुमारास मेहकर नजीक आला असता एका कारला धडक दिली. सुदैवाने या कारमधील प्रवाशी बालंबाल बचावले. त्यांनी कार वेगात घेत ट्रक थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने आणखी वेगात घेऊन पळवला. त्यामुळे कारमधील प्रवाशांना शंका आल्याने त्यांनी ट्रकचा पाठलाग सुरू केला. (Sambhajinagar) कारचालक पाठलाग करीत असल्याचे लक्षात येताच ट्रक चालक घाबरला. भरधाव वेगाने आयशर पळवताना त्याने महामार्गावरील आणखी काही वाहनांना धडक दिली. 

Sambhajinagar News
Ulhasnagar News : कर थकबाकीधारकांना उल्हासनगरमध्ये 'अभय'; १०० टक्के विलंब शुल्क होणार माफ

याचा दरम्यान कारमधील विजय पवार आणि सहकाऱ्यांनी ट्रकचा पाठलाग करीत महामार्ग पोलिस निरीक्षक नागरे यांना घटनेची माहिती दिली. त्याचबरोबर फुलंब्री पोलिस ठाण्याचे (Police) पोलिस निरीक्षक संजय सहाणे यांनाही माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ समृद्धी महामार्गावर सावंगी इंटरचेंजवर ट्रक आडवी लावून भरधाव निघालेल्या ट्रकला रोखले. यानंतर महामार्ग पोलिस आणि फुलंब्री पोलिस कर्मचाऱ्यांनी ट्रकची तपासणी केली असता त्यात गुटखा आढळून आला. पोलिसांनी चालक फिरोज शेख याला ताब्यात घेत ट्रक फुलंब्री पोलिस ठाण्यात जमा केला आहे. साधारण ६४ लाखाच्या गुटख्यासह ८४ लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com