Dashrath Raikar death news  Saam TV Marathi
महाराष्ट्र

Antarwali Sarati : अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकाचा दुर्दैवी मृत्यू; बीड जिल्ह्यावर शोककळा!

Maratha protester dies at Antarwali Sarati : मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बीडहून अंतरवाली सराटीत आलेल्या दशरथ रायकर यांचा अचानक मृत्यू झाला. प्राथमिक अंदाजानुसार हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Namdeo Kumbhar

अक्षय शिंदे पाटील, जालना प्रतिनिधी

Dashrath Raikar death news : मराठा आरक्षणाच्या लढ्यात अंतरवाली सराटी येथून एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या एका मराठा आंदोलकाचा अंतरवाली सराटीत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे अंतरवाली सराटीसह संपूर्ण मराठा आंदोलकांमध्ये आणि बीड जिल्ह्यात तीव्र शोककळा पसरली आहे. (Manoj Jarange Patil latest news)

दशरथ रायकर (रा. संगम, ता. जि. बीड) असे मृत्यू झालेल्या निष्ठावंत मराठा आंदोलकाचे नाव आहे. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

नक्की काय घडले?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दशरथ रायकर हे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बीडहून अंतरवाली सराटी येथे आले होते. गुरुवारी रात्री उशिरा अंतरवाली परिसरातील एका शेतात ते इतर आंदोलकांसोबत झोपले होते. पण शुक्रवारी सकाळी सर्वजण उठल्यानंतर रायकर हे झोपेतून उठलेच नाहीत.

सहकाऱ्यांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे उपस्थित आंदोलकांनी तातडीने त्यांना रुग्णवाहिकेतून अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.

हृदयविकाराचा झटका आल्याचा प्राथमिक अंदाज

दशरथ रायकर यांचा मृत्यू अचानक हृदयविकाराचा झटका आल्यामुळे झाला असावा, असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांकडून वर्तवण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन आणि जरांगे पाटील यांच्या समर्थकांनी रुग्णालयात धाव घेतली. रायकर यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी सरकारी रूग्णालयात पाठवला आहे. अहवालानंतरच त्यांच्या मृत्यूचं कारण समोर येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रोत्सवाची तिसरी माळ; तुळजापुरात भाविकांची मांदियाळी

Mint-Lemon Juice For Liver Health: लिव्हरच्या आरोग्यासाठी बेस्ट ड्रिंक, आठवड्यातून 2 वेळा प्यायल्यास होईल फायदा

Shardiya Navratri 2026 : यंदाच्या नवरात्रीत अष्टमी-नवमी कधी आहे? तिथीमुळे कन्फ्यूजन वाढलंय? जाणून घ्या शुभ मुहूर्त

भाजप आमदारालाच गंडा घालण्याचा प्रयत्न! SBI मध्ये नोकरीचं आमिष, नेमकं प्रकरण काय?

कोकणात उष्णतेची लाट! रत्नागिरीत 'ऑक्टोबर हिट'चा तडाखा, १४३ वर्षांतील विक्रमी तापमानाची नोंद

SCROLL FOR NEXT