Maratha Reservation Survey
Maratha Reservation Survey Saam TV
महाराष्ट्र

Maratha Reservation Survey: धक्कादायक! मराठा सर्वेक्षणासाठी विद्यार्थ्यांना लावलं कामाला; शिक्षकांवर कारवाईची मागणी

Ruchika Jadhav

Bhandara:

राज्यात सर्वत्र मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षणाचं काम जोरात सुरू आहे. शालेय शिक्षकांना सर्वेक्षणाचं काम देण्यात आलं आहे. शिक्षकांवर या कामाचा भार आल्याने त्यांनी हा भार विद्यार्थ्यांच्या खांद्यावर टाकल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यातून समोर आली आहे.

सर्वेक्षणाच्या कामामुळे अनेक शाळांमध्ये शिक्षकांना ओव्हर टाइम कारावा लागत आहे. याचा फटका विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर बसत आहे. ऐन दहावी आणि बारावीच्या परीक्षा तोंडावर असताना सर्वेक्षण सुरू झाल्याने काही शाळांमध्ये बारावी आणि दहावीच्या सराव परीक्षांवर याचा परिणाम झाला. अशात आता भंडारा जिल्ह्यामधून धक्कादायक प्रकार समोर आला असून शिक्षक आपल्या कामासाठी विद्यार्थ्यांना गावात फिरवत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

हा व्हिडिओ लाखनी तालुक्यातील गोंडेगाव येथील असून या प्रकरणी मेंढे शिक्षकाचे नाव समोर आले आहे. या संदर्भात जिल्हा परिषद शिक्षण सभापती यांना विचारले असताना त्यांनी शिक्षण अधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. तर योग्य चौकशी करुन कारवाही केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगीतले आहे.

सरकारकडून मिळणारा भरगच्च पगार शिक्षक घेतात. मात्र आपले काम करण्यासाठी विद्यार्थ्यांनासोबत घेतात. शिक्षकांसोबत गेल्याने विद्यार्थ्यांचे नक्कीच शैक्षणिक नुकसान होत असल्याने आता या शिक्षकावर काय कारवाही होते ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सर्वेक्षणासाठी खाजगी व्यक्तीची नेमणूक

सोलापुरातही मराठा आरक्षणाच्या सर्व्हेदरम्यान एक धक्कादायक प्रकार उघड झालाय. सोलापूर महापालिकेच्या वतीने नेमण्यात आलेल्या प्रगणकाने खासगी कर्मचारी नेमले आहेत. महापालिका कर्मचारी असलेल्या अनिल खरटमल याने स्वतःची नेमणूक असताना अन्य दोन खासगी लोकांना सर्व्हे करण्यासाठी नेमलंय. सकल मराठा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अनंत जाधव यांनी हा प्रकार उघड केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Live News Updates : कुणबी मराठ्यांची पोट जात, मग आरक्षण का नाही, मनोज जरांगेंचा सवाल

Ravikant Tupkar : रविकांत तुपकरांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग; या जिल्ह्यातील सर्व जागांचीही केली घोषणा? राज्यात किती जागा लढवणार?

Wrinkle Problems : तुमच्या चेहऱ्यावर कमी वयात सुरकुत्या दिसतायेत? जाणून घ्या कारणं

VIDEO: सरकारने आत्मचिंतन करावं, पुण्यातील 'त्या' घटनेवरुन विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर निशाणा

Hina Khan: शॉर्ट हेअरमध्ये हिना दिसतेय फारच क्यूट!

SCROLL FOR NEXT