Bhandara Accident: रूग्णालयातून घरी परतताना दुचाकीचा भीषण अपघात, भावासमोरच बहिणीचा मृत्यू

Bhandara Accident News: भंडाऱ्यात भीषण अपघात झाला आहे. भरधाव टिप्परने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात एक महिला जागीच ठार झालीय.
 Accident News
Accident NewsSaam Tv

Bhandara Accident Tipper Collided With Bike

दिवसेंदिवस रस्ते अपघातांचं प्रमाण वाढत आहे. वाहनांचा भरधाव वेग याला कारणीभूत ठरतोय. असाच एक भीषण अपघात भंडाऱ्यात झालाय. टिप्परने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झालाय. याबाबत आपण सविस्तर जाणून घेवू या.

अफसाना शेख (३५) आणि त्यांचा भाऊ कलीम शेख हे दुचाकीवरून जात होते. त्यांच्या दुचाकीला भरधाव टिप्परने धडक (Bhandara Accident) दिली. या घटनेच अफसाना शेख यांचा जागीच मृत्यू (death) झाला, तर कलीम शेख (४०) यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर वातावरण चांगलंच तापलं. शेकडोंच्या संख्येतील संतप्त जमाव घटनास्थळी पोहचला. मात्र पोलिसांच्या समय सूचकतेमुळे पुढील अनर्थ टळला.

'असा' घडला अपघात

टिप्पर गिट्टी घेऊन तुमसरकडे जात होता. भंडारा शहरातील राजीव गांधी चौकातून दुचाकीवरून अफसाना आणि कलीम हे दोन्ही बहिण भाऊ रुग्णालयातून घरी जात होते. दरम्यान या चौकातील वळणावर टिप्परने दुचाकीला उडविले. या दोघांनाही दुचाकीसह सुमारे २० फूट घासत नेले. यात अफसाना शेख या महिलेचा मृत्यू (death) झाला. तर कलीम शेख याच्या पायाला गंभीर दुखापत झालीय. पायाचा अक्षरशः चुरा झालाय.

हा अपघात (Bhandara Accident) झाला तेव्हा चौकात मोठ्या प्रमाणात गर्दी आणि वर्दळही होती. योगायोगाने समोरून येणाऱ्या एका पोलिसांच्या वाहनाला हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीने आपल्या वाहनातून या दोघांनाही एका खाजगी रुग्णालयात पोहोचले. तिथे डॉक्टरांनी अफसाना यांना मृत घोषित केलं.

 Accident News
Sambhajinagar Accident: पैठण रोडवरील कांचनवाडीत मोठा अपघात! ट्रकची दुचाकी आणि गाड्यांना जबर धडक, महिला जागीच ठार

अपघातानंतर टिप्परवर दगडफेक

अपघातानंतर टिप्पर चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यालाही संतप्त जमावाने मारहाण केली. त्याने जवळ असलेल्या पोलीस ठाण्यात धाव घेतली. चालकाचे नाव कळू शकले नाही. या अपघाताची माहिती पसरताच शेकडोंच्या संख्येने जमाव चौकात पोहोचला.

अपघातानंतर (Bhandara Accident) टिप्परवर दगडफेक करण्याचाही प्रयत्न झाला. मात्र पोलिसांनी तातडीने धाव घेऊन गर्दी पांगविली. घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी बागुल यांनी भेट दिली. त्यानंतर ही परिस्थिती नियंत्रणात आणली. रात्री उशिरापर्यंत पोलिसांचा बंदोबस्त चौकात तैनात होता.

 Accident News
Bus Accident : बस- ट्रॅक्टरचा अपघात; चालकाचा मृत्यू, प्रवाशी जखमी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com