Manoj Jarange Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange: मोठी बातमी! मनोज जरांगे मुंबईकडे रवाना, आंदोलनासाठी परवानगी मिळेल का?

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील हे मुंबईतील आंदोलनावर ठाम आहेत. मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली असताना देखील ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

Priya More
  • मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना

  • मनोज जरांगे अंतरवाली सराटीवरून मुंबईच्या दिशेने निघाले

  • मनोज जरांगे यांनी तिसऱ्यांदा आंदोलनासाठी परवानगी मागितली

  • आझाद मैदानावर मनोज जरांगे यांना उपोषणाची परवानगी पोलिसांनी नाकारली

मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज १८ वा दिवस आहे. प्रकृती खालावलेली असताना देखील त्यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. मनोज जरांगे पाटील हे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्यावर ठाम आहेत. या उपोषणासाठी त्यांनी मुंबई पोलिसांकडे २ वेळा परवानगी मागितली पण पोलिसांनी परवानगी नाकरली असे असताना देखील ते मुंबईकडे निघाले आहेत. आता त्यांनी परवानगीसाठी तिसऱ्यांदा मुंबई पोलिसांना अर्ज केला आहे.

मनोज जरांगे पाटील मुंबईत उपोषण करण्यावर ठाम आहेत. 'मरणार पण शरण जाणार नाही. त्यामुळे तुम्ही एकजूट राहा आणि शांत रहा.', असे आवाहन मनोज जरांगे यांनी आपल्या मराठा बांधवांना केले. मनोज जरांगे पाटील २ रुग्णवाहिका आणि दोन वाहनांच्या ताफ्यासह मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. आज मनोज जरांगे यांनी आझाद मैदान पोलिसांकडे तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज सादर केला. आझाद मैदान पोलिस परवानगी देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मुंबईत उपोषणासाठी आझाद मैदानावर परवानगीची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना परवानगी मिळणे धूसर आहे. गणेशोत्सव दरम्यान कोणत्याही आंदोलनास पोलिसांकडून परवानगी दिली जात नाहीच. गणेशोत्सवमध्ये परवानगी दिल्यास कायदा सुव्यवस्था प्रश्न उद्धभू शिकतो. पोलिसांवर यांचा ताण पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेशोत्सवानंतरच त्यांना परवानगी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान मुंबईला निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांचा पहिला मुक्काम बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे असेल. दुसरा मुक्काम अहिल्यानगरमधील श्रीगोंधा येथे असेल. तिसरा मुक्काम पुण्यातील हडपसर येथे असेल. चौथा मुक्काम रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे असेल. त्यानंतर पाचव्या दिवशी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत. मनोज जरांगे मुंबईकडे निघाले जरी असले तरी देखील त्यांना पोलिसांकडून परवानगी मिळाल्याशिवाय उपोषणाला बसता येणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

Guava Leaves Benefits for Eye Stye : डोळ्याला रांजणवाडी आली असेल तर पेरूच्या पानांचा सोपा उपाय करा; मिळेल त्वरित आराम

कोल्हापुरात प्रेमसंबंधातून थरारक घटना; अपहरण केलं नंतर प्रेयसीला खोल दरीत ढकललं!

SCROLL FOR NEXT