

मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा परवानगी मागितली आहे.
मुंबईतील आझाद मैदानात उपोषण करण्याच्या निर्णयावर जरांगे ठाम असल्याचे अर्जात नमूद आहे.
मुंबई पोलिसांनी यापूर्वी दोन अर्जांना परवानगी नाकारली होती.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरूय. सरकारनं मागण्या मान्य केल्या नसल्यानं जरांगेंनी चलो मुंबईचा नारा दिलाय.परंतु मुंबई पोलिसांनी त्यांना आंदोलनासाठी परवानगी दिली नाहीये. पोलिसांनी दोनदा परवानगी नाकारल्यानंतर आता जरांगेंनी तिसऱ्यांदा परवानगीचा अर्ज केलाय. पोलिसांनी घातलेल्या सर्व अटी जरांगेंनी मान्य केल्या आहेत.
दरम्यान,मुंबईतील आझाद मैदानात उपोषण करण्याच्या निर्णयावर जरांगे पाटील ठाम आहेत. या नव्या अर्जामध्ये पोलिसांनी यापूर्वी ज्या कारणांवरून परवानगी नाकारली होती, त्या सर्व अटींचं पालन करण्याची तयारी मनोज जरांगे पाटील यांनी दर्शवली आहे. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आझाद मैदानात शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात येणार असल्याचं अर्जात नमूद करण्यात आलं आहे. आंदोलन पूर्णपणे लोकशाही आणि घटनात्मक चौकटीत राहून करण्यात येईल. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची आयोजकांकडून पूर्ण काळजी घेतली जाईल,असं अर्जात म्हटलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.