maratha candidate to contest lok sabha election against pm modi and amit shah Saam tv
महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 : मोदी शहांच्या विरोधात लढणार मराठा, मालेगावमध्ये नाव निश्चित

Maratha Samaj To Contest Lok Sabha Election : आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यभरात सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने हजारो उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्धार केला आहे.

Siddharth Latkar

- संजय सूर्यवंशी

Nanded :

मराठा आरक्षणाच्या (maratha reservation) निर्णयात राज्य सरकारने समाजाची फसवणूक केल्याची भावना मराठा समाजाची आहे. सरकारचे डाेकं ठिकाणावर आणण्यासाठी मराठा समाजाने आगामी लोकसभा निवडणुकीत (lok sabha election 2024) उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथील सकल मराठा समाजाने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm modi) आणि गृहमंत्री अमित शहा (home minister amit shah) यांच्या विराेधात निवडणुक लढविण्याचा निर्धार केला आहे. (Maharashtra News)

मराठा आरक्षणाच्या निर्णयात राज्य सरकारने समाजाची फसवणूक केली. याचा निषेध म्हणून आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यभरात सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने हजारो उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्धार केला आहे. प्रत्येक गावातून किमान दोन ते तीन उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहेत. मालेगाव येथून देखील मराठा समाजाने निवडणुकीसाठी तयारी सुरु केली. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने बैठक झाली.

नांदेड लोकसभा मतदारसंघातून प्रदीप पाटील इंगोले व तनय एकनाथराव पाटील हे उमेदवार रिंगणात उतरणार आहेत. या उमेदवारांचा अर्ज भरणे, डिपॉझिट व इतर खर्च हा समाज बांधवांच्या लोकवर्गणीतून केला जाणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघ व देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या गांधीनगर या मतदारसंघातून प्रमोद पाटील इंगोले हे स्वखर्चाने निवडणूक लढणार आहेत असे सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने सांगण्यात आले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RBI: रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय! या बँकेचा परवाना केला रद्द, कारण काय?

High Court: अल्पवयीन मुलींशी लग्न करून शरिरसंबंध ठेवणं बलात्कारच, हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्वाळा

Jhansi Hospital Fire : झाशींमध्ये हाहा:कार! रुग्णालयात १० नवजात अर्भकांचा होरपळून मृत्यू

IQ Test: मधमाशांच्या मोहोळात लपलीये एक मुंगी; शोधण्यासाठी तुमच्याकडे आहेत केवळ १० सेकंद

Viral Video: फालतू शायनिंग! धावत्या लोकलमधून चिमुकल्याचा जीवघेणा स्टंट; Video पाहून होईल संताप

SCROLL FOR NEXT