Congress Jan Aakrosh Morcha: काँग्रेसचा लाखनी तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा

पीक कर्जावरील व्याजाची सहा टक्के दराने वसुली करण्याचा निर्णय शासनाने मागे घ्यावा. शेतकऱ्यांना 18 तास वीज देण्यात यावी अशी मागणी काॅंग्रेस पदाधिका-यांनी केली.
congress morcha at lakhani tahsil karyalay
congress morcha at lakhani tahsil karyalaysaam tv
Published On

- शुभम देशमुख

Bhandara News :

शेतक-यांच्या विविध मागण्यांच्या पूर्तता करावी या मागणीसाठी आज (मंगळवार) लाखनी तहसील कार्यलायावर काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा धडकला. या माेर्चात भंडारा जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, कामगार, विडी कामगार, बेरोजगार, सुशिक्षित बेरोजगार माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

आंदाेलकांनी दिलेल्या माहितीनूसार राज्य सरकार आणि केंद्र सरकार शेतक-यांकडे दुर्लक्ष करीत आहे. अनेक वेळा मागणी करुन सुद्धा शेतक-यांना त्यांच्या शेती मालाला हमी भाव देत नाही. वेळेवर कर्ज दिले जात नाही.

congress morcha at lakhani tahsil karyalay
Success Story : भंडा-यातील शेतक-याच्या जीवनात पेरुने निर्माण केला गोडवा, 10 लाखांची कमाई

या बराेबरच पीक कर्जावरील व्याजाची सहा टक्के दराने वसुली करण्याचा निर्णय शासनाने मागे घ्यावा. शेतकऱ्यांना शेतीसाठी सकाळी 8 ते रात्री 12 पर्यत म्हणजे 18 तास वीज देण्यात यावी. (Maharashtra News)

शेतकऱ्यांना प्रिपेट मीटर देण्यात येऊ नये, शेतकऱ्यांकडून विद्युत बिल कमी आकारण्यात यावे, शहरी व ग्रामीण भागातील घरकुलाचे अनुदानात वाढ करावी तसेच लाखनी शहरातील नवीन उड्डाणपूल बंद असून ताे तात्काळ सुरू करण्यात यावा या मागण्या आंदाेलकांनी प्रशासनास निवेदनाद्वारे केल्या.

Edited By : Siddharth Latkar

congress morcha at lakhani tahsil karyalay
Chandrapur : काेणत्या दबावाला बळी पडणार नाही, आमचा लढा सुरूच ठेवणार; मुख्यमंत्र्यांना इशारा देणारे देशमूख स्थानबद्ध

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com