Chandrapur : काेणत्या दबावाला बळी पडणार नाही, आमचा लढा सुरूच ठेवणार; मुख्यमंत्र्यांना इशारा देणारे देशमूख स्थानबद्ध

CM Eknath Shinde : मनपा प्रशासनाने चंद्रपूर शहरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्याची हिंमत दाखवावी असे आव्हान पप्पू देशमुख यांनी दिले होते.
police detained pappu deshmukh before cm eknath shinde arrives in chandrapur
police detained pappu deshmukh before cm eknath shinde arrives in chandrapursaam tv

Chandrpaur :

आम्ही काेणत्या दबावाला आम्ही बळी पडणारे लाेक नाही. आम्ही आमचा लढा सुरू ठेवणार आहाेत असा इशारा जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख (pappu deshmukh) यांनी राज्य सरकारला दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्या चंद्रपूर (chandrapur latest marathi news) येथील दाै-यापूर्वी देशमुख यांनी प्रशासनास कार्यक्रम हाणून पाडण्याचा इशारा दिला हाेता. त्यापार्श्वभूमीवर पाेलिसांनी देशमुख यांना पाेलिस ठाण्यात स्थानबद्ध केले. त्यावर देशमुख यांनी प्रशासनावर ताेफ डागली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चंद्रपूर शहरात महापालिकेच्या वतीने नवीन भूमिगत गटार योजना मंजूर झाली आहे. त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज विसापूर येथे आयाेजिले आहे. ही योजना चंद्रपूर शहराची आणि भूमिपूजन विसापुरात कसे, असा सवाल करीत या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्र्यांनी येवून दाखवावे, असा इशारा जाहीर इशारा पप्पू देशमुख यांनी दिला होता.

police detained pappu deshmukh before cm eknath shinde arrives in chandrapur
EVM ला विराेध, बॅलेट पेपरवर निवडणूक न झाल्यास मतदान केंद्रावर 'ईव्हीएम फोडो' आंदोलन छेडणार : श्रीरामपूरमधील नागरिकांचा इशारा

या नव्या गटार योजनेवर 506 कोटी रुपये खर्च होणार आहेत. 15 वर्षांपूर्वी याच शहरात शंभर कोटी रुपये खर्चून भूमिगत गटार योजना राबवण्यात आली. तेव्हाही गावातील रस्ते खोदण्यात आले. मात्र ती योजना कुठे गडप झाली, याची साधी चौकशीही झालेली नाही असे देशमुख यांनी म्हटले. (Maharashtra News

आता पुन्हा नव्याने पाचशे कोटींची तीच योजना राबवली जात आहे. यामुळे मनपा प्रशासनाने चंद्रपूर शहरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्याची हिंमत दाखवावी असे आव्हान पप्पू देशमुख यांनी प्रशासनाला दिले होते.

या पार्श्वभूमीवर रामनगर पोलिसांनी सकाळीच पप्पू देशमुख यांना ताब्यात घेऊन पाेलिस ठाण्यात बसवून ठेवले. दरम्यान, अशा दबावाला आम्ही बळी पडणार नाही. लढा असाच सुरू राहील, अशी प्रतिक्रिया देशमुख यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

police detained pappu deshmukh before cm eknath shinde arrives in chandrapur
Pathari Pokharni Highway Accident News : पाथरी पोखर्णी महामार्गावर ट्रॅक्टरची कठड्याला धडक, चालकाचा मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com