- विनाेद जिरे / अजय सोनवणे
मुस्लिम धर्मीयांच्या पवित्र रमजान महिन्यास सुरुवात झाली आहे. यामुळे बाजारपेठेत विविध देशातील पेंडखजूर, खजूर विक्रीसाठी दाखल झाले आहेत. सौदी अरेबिया, इराण, इराक, मक्का मदिना देशातील पेंडखजूर, खजूर विक्रीसाठी बीडसह नाशिक, सातारा येथील बाजारपेठेत उपलब्ध आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
रमजान महिन्यात पेंडखजुराला मोठी मागणी असते. हे खजूर बीड येथील बाजारपेठेत शंभर रुपये तर दोन हजार रुपये प्रति किलो प्रमाणे विक्रीसाठी उपलब्ध झालेत. मरियम, अजवा, कलमी, केमिया या खजुरांना मोठी मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्ये रमजान पर्वा निमित्त बाजारपेठा व दुकाने सज्ज झाली आहेत. रमजानचे रोजे (उपवास) सोडताना खजूराला अतिशय महत्व असते. त्यामुळे मालेगावातील खजूर विक्रेत्यांकडे विविध प्रकारच्या खजूर उपलब्ध झाले आहेत. (Maharashtra News)
त्याच्या खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. साधारण २०० रुपयांपासून ते १२०० रुपये प्रतिकिलाे असा दर खजूराचा आहे. याबरोबरच फळांना देखील मागणी वाढणार असल्याची माहिती फळ विक्रेत्यांनी दिली.
Edited By : Siddharth Latkar