Maratha Reservation In Maharashtra Saam TV
महाराष्ट्र

Maratha Reservation In Maharashtra: मराठा आरक्षण आंदोलनाची धग कायम; आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांचा पुन्हा हवेत गोळीबार

Maratha Reservation Protest: काल घडलेल्या घटनेमुळे जालन्यात सर्वत्र निषेध व्यक्त केला जात असताना आता पोलिसांकडून पुन्हा एकदा हवेत गोळीबार झाला आहे.

Ruchika Jadhav

Maratha Aarakshan Latest News 2023:

जालन्यातील मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन काल मोठ्याप्रमाणावर चिघळलं. पोलिसांनी आंदोलकांवर बेदम लाठीमार केला. काल घडलेल्या घटनेमुळे जालन्यात सर्वत्र निषेध व्यक्त केला जात असताना आता पोलिसांकडून पुन्हा एकदा हवेत गोळीबार झाला आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, धुळे- सोलापूर महामार्गावर आंदोलकांच्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून पुन्हा हवेत गोळीबार करण्यात आला आहे. काल झालेल्या लाठीमाराचा निषेध व्यक्त करत आज सोलापूरात आंदोलन सुरू होते. येथे आक्रमक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून हवेत गोळीबार करण्यात आला. आंदोलनामुळे वाहतूक कोंडी झाली होती. मात्र आता महामार्गावरील वाहतूक पोलिसांनी सुरळीत केली आहे.

राज्यात आज सकाळपासून विविध ठिकाणी आंदोलनास सुरूवात झाली आहे. ७ जिल्ह्यांमध्ये आज बंद ठेवण्यात आला होता. शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने देखील वाशिममध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं.

जालना जिल्हयात लाठीचार्ज केल्याने यामध्ये अनेक निष्पाप स्त्री-पुरुष जखमी झाले. या लाठीचार्जच्या निषेधार्थ सकल मराठा समाज, संभाजी ब्रिगेड आणि शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने वाशिम शहरातील राजमाता जिजाऊ चौकात आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे काही काळ हैदराबाद - अकोला या महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी आंदोलनकर्त्यांच्या वतीने लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांना निलंबित करा, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्याव्या या मागण्या करण्यात आल्या.

लाठीचार्ज प्रकरणाचा निषेध करत पेटवली स्वतःची कार

पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीचार्जचे तीव्र पडसाद संभाजीनगर शहरामध्ये दिसायला लागलेत. त्यातच फुलंब्री तालुक्यातील एका सरपंचाने संभाजीनगर- जळगाव महामार्गावर फुलंब्रीमध्ये रस्ता अडवून स्वतःची कार पेटवून रास्ता रोको केला आणि या घटनेचा तीव्र निषेध केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT