Mumbai Crime News: मृतदेहाचे ४ तुकडे केले, पत्नीची छेड काढत असल्याचा आरोपीला संशय

Mumbai Crime News: मुंबईत १७ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
Mumbai Crime News:
Mumbai Crime News: Saam tv
Published On

सचिन गाड

Mumbai Crime News In Marathi:

मुंबईतून धक्कादायक घटना समोर आलं आहे. मुंबईत १७ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या मुलाची कोयत्याने हत्या करून शरीराचे चार तुकडे केल्याचाही प्रकार समोर आला आहे. मुंबईतील आरसीएफ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील चेंबूरजवळील वाशी नाका परिसरात १७ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलाची कोयत्याने हत्या करून शरीराचे चार तुकडे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ईश्वर मारवाडी असे मृत मुलाचे नाव आहे.

Mumbai Crime News:
Bhandara Crime News: बायकोच्या डोक्यात पाट घालून हत्या, नंतर नवऱ्यानेही कालव्यात मारली उडी

आरोपीने मुलाचे हत्या करत डोके, दोन हात वेगळे केले. आरोपीने हत्या केल्यानंतर स्वयंपाक घरातच मृतदेहाचे तुकडे पिशवीत लपवून ठेवले होते. मृत आरोपीच्या पत्नीची छेड काढत असल्याच्या संशयावरून हत्या आहे.

या प्रकरणी आरसीएफ पोलिसांनी ३३ नावाच्या शफी शेख आरोपीला अटक केली आहे. हा धक्कादायक प्रकार मुंबईच्या म्हाडा कॉलनी, वाशी नाका येथे घटना घडल्या आहेत. दरम्यान, मृत ईश्वराच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला आहे. तो आठ वर्षाचा असल्यापासून ईश्वरचा सांभाळ आरोपीच्या पत्नीच्या पालकांनी केला होता.

Mumbai Crime News:
Ahmednagar Crime News: नगरमध्ये चाललंय काय? पोलिसांच्या उपस्थितीत तहसीलदारांना मारहाण

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 वर्षीय ईश्वरचा आरोपीच्या पत्नीच्या कुटुंबीयांनी सांभाळ करत होते. कारण ईश्वरच्या आई-वडिलांचा त्याच्या लहानपणीच मृत्यू झाला होता. ३३ वर्षीय शफीचा त्याच्या पत्नीची ईश्वरने छेड काढल्याचा संशय होता. त्यामुळे शफीचं डोकं संशयाने भरलं होतं.

शफीने या १७ वर्षीय ईश्वरची हत्या केली. आरोपीने हत्या करत ईश्वरचे चार तुकडे केले. हत्या केल्यानंतर स्वयंपाक घरातच त्याच्या मृतदेहाचे तुकडे पिशवीत लपवून ठेवले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com