नागपुरात मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा असंवेदनशील प्रकार उघडकीस आला आहे. अत्यंत संतापजनक कृत्य एका अॅम्बुलन्स चालकाने एका कुटुंबियांसोबत केला आहे.
आजारपणामुळे कुटुंबातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाला होता. रुग्णवाहिकेतून मृतदेह मूळ गावी नेण्यात आला. मात्र जिथे संवेदना संपतात तिथे काय बोलावं असंच काहीसं घडलं. शवावाहिका चालकाने घरात कुणीच नसल्याची संधी साधत मृतदेह घेऊन गेला आणि स्वतःच्या मुलाला त्या घरात चोरी करण्यासाठी सांगितलं. पोलिसांनी या सगळ्या प्रकाराचा छडा लावला असून बाप-लेकाला अटक केली आहे. (Crime News)
नागपूरच्या सक्करदरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या कल्पना घोडे यांच्या पतीवर उपचार सुरू असताना 20 ऑगस्ट रोजी त्यांच्या पतीचं निधन झालं. त्यांनी अंत्यसंस्कार करण्यासाठी मध्यप्रदेशच्या बैतुल जिल्ह्यातील गावात जाऊन अंत्यसंस्कार करण्यासाठी अॅम्बुलन्स मागवली. अॅम्बुलन्स चालक अश्वजीत वानखडे मृतदेह घेऊन रवाना झाला. (Latest Marathi News)
घोडे यांच्या घरात कोणीच नसल्याची कल्पना त्याला होती. अश्वजीतने मुलगा नितेशला चोरी करण्याची टीप दिली. नितेशने अल्पवयीन साथीदारांना घेऊन घरात चोरी करत सोन्याचे दागिने आणि रोख लंपास केली. कल्पना घोडे यांना चोरी झाल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी सक्करदरा पोलिसात तक्रार दिली.
पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करत चौकशी सुरू केली. आजूबाजूचे सीसीटीव्ही तपासले असता त्यामध्ये तीन जण मोपेडवर येऊन चोरी करून गेल्याचं समोर आलं. सक्करदरा पोलिसांनी तात्काळ त्या मुलांच्या वर्णनावरून इमामवाडा हद्दीतून नितेश वानखडेला अटक केली. त्यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी बाप-लेकाला अटक करत पुढील तपास सुरू केला आहे. तसेच त्यांच्याकडून चोरी केलेला संपूर्ण मुद्देमालाही हस्तगत केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.