Mumbai News : मद्यधुंद महिलेचा पबमध्ये धिंगाणा; पब कर्मचारी-पोलिसांवर हल्ला करत चावाही घेतला, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

Crime News : आंबोली पोलिसांनी महिला आणि तिच्या दोन साथीदारांना अटक केली आहे.
Mumbai Crime News
Mumbai Crime News Saam TV

संजय गडदे

Mumbai News :

मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील आंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लॉर्ड ड्रिंक या पबमधील एक धक्कादायक घटना उजेडात आली आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या महिलेने पबमधील कर्मचारी आणि मदतीसाठी आलेल्या पोलिसांना देखील मारहाण केल्याची घटना घडली आहे.

रात्री उशीरा ही घटना घडली. हॉटेलमधील कर्मचारी आणि सात पोलीस कर्मचाऱ्यांना या महिलेकडून मारहाण झाली आहे. याप्रकरणी आंबोली पोलिसांनी महिला आणि तिच्या दोन साथीदारांना अटक केली आहे.

आरोपी महिला ही आपल्या दोन साथीदारांसह आंबोलीच्या लॉर्ड द ड्रिंक या पबमध्ये रात्री आल्यानंतर दोन वाजण्याच्या सुमारास या महिलेने पबमधील कर्मचाऱ्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. या कर्मचाऱ्याने 100 नंबर वर फोन करून पोलिसांची मदत मागवली असता आंबोली पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी त्या पबमध्ये पोहोचले. त्यानंतर ती महिला आणि तिच्या दोन साथीदारांनी ASI आणि पोलीस कॉन्स्टेबल महिला अधिकारी यांना मारहाण केली. (Latest Marathi News)

Mumbai Crime News
Mumbai Crime News : १० वर्षापूर्वीचा ब्लर फोटो अन् हातावरील टॅटू... हत्या प्रकरणातील आरोपी ७ वर्षांना गजाआड, पोलिसांना कसा केला तपास?

यानंतर या अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती आंबोली पोलीस स्टेशनला दिल्यानंतर नाईट PI मुकुंद यादव आणि महिला अधिकारी सोबत बीट मार्शलची गाडी घेऊन पबला पोहोचले. मात्र नाईट PI मुकुंद यादव यांच्यावर देखील महिलेने हल्ला केला. (Crime News)

शिवाय मद्यधुंद अवस्थेत असलेल्या महिलेने एक महिला पोलीस अधिकाऱ्याला दाताने चावा घेतल्यामुळे ती महिला पोलीस अधिकारी जखमी झाली आहे. महिलेने केलेल्या हल्ल्यामध्ये सात पोलीस अधिकारी आणि तीन हॉटेल कर्मचारी असे 10 लोक जखमी झाले आहेत. महिलेचा संपूर्ण धिंगाणा पबमध्ये असलेला सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला आहे. आंबोली पोलिसांनी लॉर्ड द ड्रिंक या पबचा सीसीटीव्ही ताब्यात घेतला आहे.

Mumbai Crime News
Panvel Missing Girl News: २० वर्षीय तरुणीच्या मृत्यूचं गुढ उलगडलं; पोलीस तपासात समोर आली धक्कादायक माहिती

सध्या आंबोली पोलिसांनी महिला आणि तिच्या दोन साथीदाराला ताब्यात घेतलं आहे. आंबोली पोलिसांनी त्या महिला आणि साथीदाराचा मेडिकल करून पुढील कारवाईसाठी आंबोली पोलीस स्टेशनला आणले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com