Mumbai Crime News : १० वर्षापूर्वीचा ब्लर फोटो अन् हातावरील टॅटू... हत्या प्रकरणातील आरोपी ७ वर्षांना गजाआड, पोलिसांना कसा केला तपास?

Police Investigation : टॅटूच्या आधारावर हत्या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली आहे.
arrests
arrestssaam tv

Mumbai News :

पोलिसांना गुन्हेगाराची एक चूक त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी पुरेशी असते. पोलिसांनी एका छोट्या पुराव्याच्या आधारावर ७ वर्षांनी नालासोपारा येथील एका हत्येचा उलगडा केला आहे. एका टॅटूच्या आधारावर हत्या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शिवबाबू निषाद याला पोलिसांनी अटक केली आहे. नालासोपारा येथे २०१६ मध्ये एका व्यक्तीची हत्या झाली होती. शिवबाबूने तीन जणांच्या मदतीने सुभाष चंद्र उर्फ ​​भालू रामसागर गुप्ता याची हत्या केली होती. हत्येनंतर आरोपीने दागिने व मोटारसायकल घेऊन पळ काढला. (Crime News)

arrests
Dog Attack on School Girl : शाळकरी मुलीवर अचानक भटक्या कुत्र्यांचा हल्ला, लचके तोडत ओढत नेलं; भयानक VIDEO Viral

पोलीस निरीक्षक साहुराज रणवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची ओळख आम्ही एका फोटोवरून केली होती, ज्यात त्याने हातावर टॅटू काढला होता. शिवबाबूच्या हातावार नाव आणि तीन स्टार असलेला टॅटू होता. या टॅटूचा काही आरोपीने मिटवला होता. मात्र तीन स्टार असलेला टॅटू कायम ठेवला होता. यावरुन त्याची ओळख पटली आहे. (Latest news)

तुळींज पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या गुन्ह्यात त्याचे संशयित आरोपी म्हणून शिवबाबूचे नाव होते. वसई गुन्हे शाखेला आरोपी उत्तर प्रदेशात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांकडे आरोपीची ओळख पटवण्यासाठी २०१३ मधील अस्पष्ट फोटो होता. तर त्याच्या उजव्या हातावर नाव आणि तीन स्टार असं टॅटू असल्याची माहिती पोलिसांकडे होती. एवढ्या माहितीच्या आधारावर आरोपीपर्यंत पोहेचण्याचं आव्हान पोलिसांसमोर होतं.

arrests
INDIA Mumbai Meeting : मुंबईतील बैठकीनंतर 'इंडिया'ची दिशा ठरणार? देशाला ५ प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता

नालासोपारा येथील हत्येला ७ वर्ष उलटली होती. आरोपीही आपण सुटलो अशा अर्विभावात निश्चिंत होता. मात्र पोलिसांच्या तपासातून तो सुटला नाही. सात वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला उत्तर प्रदेशच्या राजापूर येथून बेड्या ठोकल्या. आरोपीने २०१६ मधील हत्येची कबूलीही दिली आहे. एका टॅटूच्या आधारावर पोलिसांना केलेल्या कारवाईच कौतुक होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com