INDIA Mumbai Meeting : मुंबईतील बैठकीनंतर 'इंडिया'ची दिशा ठरणार? देशाला ५ प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता

Politicsl news : इंडिया आघाडीच्या दोन दिवसांच्या महत्त्वाच्या बैठकीत अनेक मुद्दे चर्चिले जाऊ शकतात.
INDIA
INDIASaam TV

Mumbai News :

देशभरातील विरोधीपक्षांच्या इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक मुंबईत पार पडत आहे. पाटना, बंगळुरुनंतरची ही तिसरी बैठक आहे. आजच्या बैठकीत इंडिया आघाडीतील पक्षांची संख्या २६ वरुन २८ वर पोहोचली आहे. आजच्या बैठकीत सर्वच पक्षांचे प्रमुख नेते सहभागी होणार आहेत. या बैठकीत कोणत्या विषयांवर चर्चा होऊ शकते, यावर एक नजर टाकूया.

इंडिया आघाडीच्या दोन दिवसांच्या महत्त्वाच्या बैठकीत अनेक मुद्दे चर्चिले जाऊ शकतात. यामध्ये इंडिया आघाडीचे संयोजक कोण असतील, लोकसभा निवडणुकीत जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असेल, पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल? अशा महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होऊन, काही महत्त्वाच्या घोषणा देखील होऊ शकतात. (Latest News Update)

INDIA
India Alliance News: इंडिया आघाडीची ताकद वाढली, आणखी दोन पक्ष झाले सहभागी

लोकसभेचं जागावाटप कसं असेल?

आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून इंडिया आघाडीची स्थापना झाली आहे. मात्र आघाडीमध्ये पक्षांचा संख्या मोठी असल्याने जागावाटप कसं असेल, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यावर सविस्तर चर्चा आजच्या बैठकीत होऊ शकतो. जागावाटपाचा राज्यनिहाय विचार करुन फॉर्म्युला ठरवला जाऊ शकतो. जागावाटपासाठी एखाद्या समितीची स्थापना करुन त्या समितीवर ही जबाबदारी सोपवली जाऊ शकतो.

'इंडिया'चे संयोजक कोण?

इंडिया आघाडीचे संयोजक म्हणून काही प्रमुख नेत्यांचा नावे चर्चेत आहे. यामध्ये नितीशकुमार यांचं नाव आघाडीवर होतं. मात्र आघाडीतील काही नेत्यांना त्यांच्या नावाला विरोध केल्याचीही माहिती समोर येत आहे. या व्यतिरिक्त ममता बॅनर्जी, मल्लिकार्जुन खरगे यांची नावंही चर्चेत आहे. संजोजकाकडे सर्व पक्षांची समन्वय साधण्याची महत्त्वाची जबाबदारी असणार आहे. त्यामुळे शरद पवारांचं नावही समोर येत आहे. शरद पवारांनी ही जबाबदारी स्वीकारावी अशीही मागणी होत असल्याचीही चर्चा आहे.

पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण?

पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर इंडिया आघाडीतून पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल, यावरही आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. अनेक पक्षाच्या नेत्यांनी आपल्या नेत्याला पंतप्रधानांचा चेहरा करावा अशी इच्छा व्यक्त केली आहे. आम आदमी पक्षातून अरविंद केजरीवाल यांचे नाव घेतले जात असताना, सपामधून अखिलेश यादव, राहुल गांधी, ममता बॅनर्जी, नितीश कुमार, मल्लिकार्जुन खरगे यांची नावे घेतली जात आहेत. उद्धव ठाकरे यांचं देखील नाव समोर येत आहे.

INDIA
India Aghadi Meeting: मुंबईत इंडिया आघाडीची आज महत्वपूर्ण बैठक; उद्धव ठाकरेंकडून डिनरचं आयोजन, मेन्यूमध्ये खास काय?

थीम साँग आणि लोगो

इंडिया महाआघाडीचे नवे थीम साँग आणि लोगो आज रिलीज केला जाऊ शकतो. इंडिया आघाडीचे थीम सॉंग अनेक भाषांमध्ये असू शकतं. तसेच इंडिया आघाडीच्या लोगोचंही आज अनावर होण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com