manoj jarange kunbi certificate controversy targets eknath Shinde again saam tv
महाराष्ट्र

Manoj Jarange : कुणबी प्रमाणपत्राचा वाद पेटला, मनोज जरांगेंचा एकनाथ शिंदेंवर पुन्हा हल्लाबोल; म्हणाले, मी कुणाचा मिंधा...

Manoj Jarange vs Eknath Shinde : मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदेंवर पुन्हा हल्ला चढवला आहे. ते काय म्हणाले, वाचा

Nandkumar Joshi

बालाजी सुरवसे, धाराशिव | साम टीव्ही

कुणबी प्रमाणपत्र रद्द केल्याच्या मुद्द्यावरून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील प्रचंड आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर काल, गुरुवारी टीका केल्यानंतर आज, शुक्रवारी पुन्हा त्यांनी शिंदेंवर हल्ला चढवला आहे. शिंदेंची स्तुती केली याचा अर्थ असा होत नाही की त्यांनी आमच्या पोरांचे मुडदे पाडावेत. मी कुणाचाही मिंधा नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. ते धाराशिवमध्ये बोलत होते.

कुणबी प्रमाणपत्र रद्दच्या मुद्द्यावरून जरांगे आक्रमक झाले आहेत. एकनाथ शिंदेंवर ते तुटून पडले आहेत. मी कुणाचाही मिंधा नाही, असा टोला लगावतानाच, तुम्ही प्रमाणपत्र रद्द केले तर मला तुमच्या मित्रत्वाची गरज नाही. माझ्यासाठी समाज महत्वाचा आहे, अशा शब्दांत त्यांनी शिंदेंना सुनावलं.

प्रमाणपत्र रद्द करून तुम्ही आमच्या पोरांचे मुडदे पाडणार असाल तर मला मित्रापेक्षा माझा समाज महत्वाचा आहे. समाजालाही अपेक्षा आहेत, असे सांगतानाच त्यांनी एकनाथ शिंदेंना लक्ष्य केले आहे. कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवरून निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही, असं महत्वाचं विधानही त्यांनी केलं. मी राजकारणासाठी नाही, तर माझ्या गरीब मराठ्यांसाठी आरक्षण मागतो; ही माझी भूमिका जुनीच असल्याचं जरांगेंनी स्पष्ट केलं.

व्हॅलिडीटी असेल तरच असल्या कुटाण्यात पडा, मी असंही समाजाला सांगत असतो, पण मी सुरुवातीपासूनच गरीब मराठ्यांसाठी आरक्षण मागत आलोय. त्या मागणीवर मी कायम असल्याचंही जरांगेंनी सांगितलं.

लाड यांचं कौतुक, तर दरेकरांवर टीकास्त्र

मनोज जरांगे पाटील यांनी प्रसाद लाड यांचं कौतुक केलं. लाड यांना वाटतं की समाजाचे कल्याण व्हावे. प्रसाद लाड किती मरमर करणार? समोरच्यांनीही त्यांना प्रतिसाद द्यायला हवा. प्रसाद लाड यांच्या मित्रालाही अक्कल यायला हवी. प्रसाद लाड यांच्यावर टीका करणाऱ्यांना ते मोजत नाहीत, आम्हीही त्यांना सोडत नाही, अशा शब्दांत त्यांनी अप्रत्यक्षपणे लक्ष्मण हाकेंवरही टीका केली. प्रमाणपत्र रद्द करण्याचा डाव मी कधीही यशस्वी होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्राही जरांगेंनी घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्यरात्री मोठा प्रशासकीय भूकंप; १४ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कोणत्या शहरात नियुक्ती?

Maharashtra News Live Update: चंद्रपूरात शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसचा मोर्चा

Chronic kidney disease: किडनीचा आजार झाला म्हणजे डायलिसिस निश्चित? 'हे' ५ गैरसमज आताच दूर करा

Latest New Mangalsutra: काळ्या मण्यांचा 'हा' लूक होतोय प्रचंड व्हायरल, पाहा मंगळसूत्राचे ६ सर्वात सुंदर डिझाईन्स

Weight Loss Tips: कमी खाल्ल्याने खरंच वजन कमी होतं का? जाणून घ्या 'या' ७ महत्त्वाच्या गोष्टी

SCROLL FOR NEXT