Manoj Jarange: तुमचा गद्दारीचा डाग आम्ही पुसला, अन् हीच उपकाराची परतफेड?, जरांगेंचा एकनाथ शिंदेंवर थेट घणाघात

Manoj Jarane On Eknath Shinde And devendra Fadnavis: कुणबी प्रमाणपत्र रद्द केल्यामुळे मनोज जरांगे पाटील चांगलेच संतप्त झाले आहेत. त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला.
Manoj Jarange: तुमचा गद्दारीचा डाग आम्ही पुसला, अन् हीच उपकाराची परतफेड?, जरांगेंचा एकनाथ शिंदेंवर थेट घणाघात
Manoj Jarane On Eknath Shinde And devendra FadnavisSaam Tv
Published On
  • मनोज जरांगे यांची एकनाथ शिंदेंवर टीका केली

  • कुणबी प्रमाणपत्र रद्द प्रकरणावर जरांगे यांची प्रतिक्रिया

  • मराठा आरक्षण आंदोलन २९ ऑगस्ट अपडेट

  • मनोज जरांगेंनी फडणवीस अन् शिंदेंना दिला इशारा

कुणबी प्रमाणपत्र रद्द केल्यामुळे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील चांगलेच संतप्त झाले आहेत. आज त्यांनी पत्रकार परिषद घेत सकारवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केले. मराठ्यांशी एकनाथ शिंदे बेईमान झाले, असा आरोप आरोप जरांगेंनी केला. एकनाथ शिंदे एवढा जिव्हारी वार करतील असं वाटलं नव्हतं. शिंदे साहेब तुमचा गद्दारीचा डाग आम्ही पुसला आणि आता तुम्ही उपकाराची परतफेड करत आहे का? असा सवाल मनोज जरांग यांनी शिंदेंना केला.

मनोज जरांगे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर डबल गेम करत असल्याचा आरोप केला. मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, 'वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीने रद्द केलेले नाही तर सरकारने रद्द केले आहे. मंत्री बावनकुळे यांनी प्रमाणपत्र रद्द करायला लावले. नोंदी शिंदे समितीने शोधायल्या ग्रामपंचायतला लावल्या. ज्यांना आम्ही मोठं केलं तेच मराठ्यांवर उटले आणि मराठ्यांशी बेईमान झाले. एकनाथ शिंदे यांचा कार्यकर्ता संभाजीनगरला कॉलेजमध्ये आहे. तो कॉलेजमध्ये बैठका घेतो. माझ्याविरोधात आंदोलन करण्यासाठी बैठका घेतो.'

Manoj Jarange: तुमचा गद्दारीचा डाग आम्ही पुसला, अन् हीच उपकाराची परतफेड?, जरांगेंचा एकनाथ शिंदेंवर थेट घणाघात
Manoj Jarange : पुन्हा आंदोलनाची ठिणगी!रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील करणार आमरण उपोषण; नेमक्या मागण्या काय?

'माझा राग असेल तर एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनी मला गोळ्या घालून मारून टाका. शिंदे साहेबांना शिव्या देणारा ऑफिसमध्ये कसा जातो. मग प्रवक्त्याला शिंदेसाहेब संपवायचे आहे का? १५ लाखांची प्रमाणपत्र वैद्य करण्यासाठी मागणी झाली. १५ लाख दिले की लगेच प्रमाणपत्र वैद्य होत का? एकनाथ शिंदे एवढा जिव्हारी वार करतील असं वाटलं नव्हतं. माझ्या गोरगरिबांच्या पोरांनी तुमचं काय केलं?', असा सवाल त्यांनी शिंदेंना केला आहे.

Manoj Jarange: तुमचा गद्दारीचा डाग आम्ही पुसला, अन् हीच उपकाराची परतफेड?, जरांगेंचा एकनाथ शिंदेंवर थेट घणाघात
Manoj jarange : मी चिडलो तर कुणालाच सोडणार नाही, कुणबी प्रमाणपत्र रद्द केल्याने जरांगे सरकारवर संतापले

यावेळी जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टच्या आंदोलनाबद्दल सांगितले की, 'आता मराठे चवताळले आहे , 29 ऑगस्टचे आंदोलनाच काहीही होऊ शकतं. काही सांगता येत नाही आता.' तसंच, बातम्या पेरल्या जात असल्याचा आरोप करणाऱ्या विखे-पाटील आणि बावनकुळेंवर देखील मनोज जरांगे यांनी टीका केली. 'हे कागद बोगस आहे का? विखे म्हणतात की बोगस असेल तर कारवाई होणार. मी राजकारणासाठी बोलत नाही. हे खरं आहे की नाही यासाठी बोलत आहे. मराठा समाजात संभ्रम निर्माण व्हायला लागला होता म्हणून मी बोललो.', असे जरांगे म्हणाले.

Manoj Jarange: तुमचा गद्दारीचा डाग आम्ही पुसला, अन् हीच उपकाराची परतफेड?, जरांगेंचा एकनाथ शिंदेंवर थेट घणाघात
Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com