मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Manoj Jarange Reaction On Caste Verification Committee Decision: मराठवाड्यातील 3 लोकप्रतिनिधींची कुणबी प्रमाणपत्रे अवैध ठरवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी या निर्णयावर फडणवीस सरकारवर गंभीर आरोप करत राजकीय स्टंट असल्याचे म्हटले आहे.

मराठवाड्यात बनावट मराठा-कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळवणाऱ्या 3 लोकप्रतिनिधींचे दाखले जात पडताळणी समितीने अवैध ठरवले आहेत. यामध्ये माजलगाव नगरपालिकेच्या नगरसेविका रेखा सरोदे, परभणी जिल्हा परिषदेच्या सदस्या कोमल पारवे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या सदस्या ज्योती शिंदे यांचा समावेश आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, संबंधित लोकप्रतिनिधी या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागण्याच्या तयारीत आहेत. यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी साम टीव्हीशी बोलताना हे जाणून बुजून केल्याचा आरोप सरकारवर केला आहे. तसेच कोणाकोणाचे रद्द झाले आहे आणि कशामुळे रद्द झाले हे मी समजून घेणार आहे. तसेच नोंदी ह्या, उर्दू , पारशी आणि मोडी लिपितल्या आहेत. जी भाषा कोणाला लिहिता वाचता येत नाहीये. यामध्ये काहीतरी राजकीय स्टंट आहे. तसेच हे सगळे मी समजून घेणार आहे असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com