Maharashtra News Live Update: मालवणमध्ये नदीत बुडून १८ वर्षीय युवकाचा मृत्यू

Marathi Breaking Live Headlines Updates: राज्यात गणेशोत्सव, राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, देशातील राजकीय घडामोडी, महाराष्ट्रातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update
Maharashtra News Live UpdateSaam Tv News
Published On: 

मालवणमध्ये नदीत बुडून १८ वर्षीय युवकाचा मृत्यू

मालवण तालुक्यातील हिवाळे धुरीवाडी येथील देवकोंड परिसरात नदीत आंघोळीसाठी गेलेल्या यश अनंत धुरी या युवकाचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. गणेशोत्सवासाठी मुंबईहून गुरुवारी वडिलांसोबत तो गावी आला होता. आज तो एका मित्रासोबत नदीत उतरला मात्र पाण्याच्या प्रवाहासोबत पुढे गेल्याने बुडाला. स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत शोध सुरू केला. दरम्यान दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर यशचा मृतदेह नदीतील गाळात आढळून आला.

साखर साठ्यासंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, साखरेच्या किमती लवकरच कमी होणार

साखरेच्या दरात 25 टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यामुळं ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तसेच सरकारने आता साखर साठा करण्याच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत, ज्यामुळे साखरेच्या किमती लवकरच कमी होण्याची शक्यता आहे.

जरांगे यांच्या मुलाच्या उपचारस्थळी एकनाथ शिंदेंच्या विरोधात कट शिजल्याचा आरोप

मनोज जरांगे पाटील यांच्या मुलावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याच ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्याविरोधात कट रचल्याचा गंभीर आरोप शिवसेना प्रवक्ते संजय लाखे, यांनी केला आहे. सामाजिक आंदोलनाचा बुरखा घालून शिंदे यांचे राजकीय चरित्र खराब करण्याची सुपारी घेतल्याचा दावाही करण्यात आला.

भिवंडी TET पेपरफुटी प्रकरणी 3500 पानांचे दोषारोपपत्र दाखल;भिवंडी फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार केस

महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणी भिवंडी न्यायालयात पोलिसांकडून जवळपास 3500 पानांचे दोषारोपपत्र पोलिसांकडून दाखल करण्यात आले आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक पुरावे तसेच साक्षीदारांचे जबाब यांचा समावेश करण्यात आला आहे.

या प्रकरणात आतापर्यंत 16 आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली असून, त्यांच्या भूमिकेची चौकशी करून तसेच पुरावे आणि जबाबांच्या आधारे दोषारोपपत्र तयार करण्यात आले आहे. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विशेष जलदगती न्यायालयाची व्यवस्था करण्यात आली आहे.

भंडारा जिल्ह्यात पावसाचे दमदार पुनरागमन

दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. दिवसभर कडक ऊन आणि प्रचंड उकाडा जाणवल्यानंतर, सायंकाळच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण जिल्ह्याला शीतलता प्रदान केली.सध्या खरीप हंगामातील धान पिके जोमात असून, पिकांना फुलोरा आणि पोंगा भरण्याच्या संवेदनशील अवस्थेत पाण्याची नितांत गरज असते.

Buldhana: भाजप आमदार स्वेता महाले यांनी पुन्हा आमदार संजय गायकवाड यांना डिचवलं

बुलडाणा -

भाजप आमदार स्वेता महाले यांनी पुन्हा आमदार संजय गायकवाड यांना डिचवलं

इन्स्टाग्राम वर व्हिडीओ अपलोड करत घेतला चिमटा

बाप तो बाप रहेगा यावरून पुन्हा आमदार महाले चर्चेत

व्हिडीओ अपलोड करून पुन्हा बुलडाणा मतदार संघ भाजप च्या टार्गेट वर.

लगाओ जोर अपने तालूकात का जरा हम भी तो जाणे तुम्हारा कोण बाप हमे नहीं जनता

Solapur: माढ्याच्या सीना नदीच्या पात्रात ५ तरुण बुडाले

पंढरपूर-

- माढ्याच्या सीना नदीच्या पात्रात ५ तरुण बुडाले

- तरुणांचा जीव वाचवण्यात स्थानिक ग्रामस्थांना यश...-

- तरुण बेपत्ता झाले असून प्रशासनाकडून नदीच्या पात्रात तरुणाचा शोध घेतला जात आहे.-

..- तरुण पोहण्यासाठी निमगाव मधील सीना नदीच्या पात्रात उतरले होते...

- ऐन गौरी सणाच्या दिवशी दुर्घटना घडल्याने गावावर शोककळा...

Pune: पुणे फेस्टिवलचे आज उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्याहस्ते उद्घाटन

पुणे -

पुणे फेस्टिवलचे आज उद्घाटन

उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्याहस्ते होतंय उद्घाटन.

राज्यपाल जिष्णु वर्मा यांच्याही प्रमुख उपस्थिती

हेमामालिनी या्ंचीही गणेश वंदना होणार

कलमाडी यांच्या पश्चात पुणे फेस्टिवल ची धुरा कृष्णकुमार गोयल यांच्याकडे दिली गेलीय

त्यानंतरचा हा पहिलाच पुणे फेस्टिवल महोत्सव आहे

पुणे फेस्टिवलचं यंदाचं 38 वे वर्ष आहे

गौरी-गणपतीसमोर साकारला ‘अजितदादांची बारामती’ देखावा; विकासकामांच्या प्रतिकृती ठरल्या आकर्षण 

बारामती तालुक्यातील डोरलेवाडी येथे विजय घनवट यांच्या घरी गौरी-गणपतीसमोर ‘अजितदादांची बारामती’ हा देखावा साकारण्यात आला आहे. या देखाव्यात अजित पवारांच्या कार्यकाळातील विविध विकासकामांच्या प्रतिकृती सादर करण्यात आल्या आहेत. तसेच सुनेत्रा पवार यांनी सांभाळलेल्या उपमंत्रीपदाच्या जबाबदारीचेही चित्रण देखाव्यात करण्यात आले आहे.

निधी वाटपावर नाराजी नाही; दौरे राज्याच्या कामासाठीच, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर 

दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवासाठी गावी आलो असून, निधी वाटपावरून नाराजी असल्याच्या चर्चा चुकीच्या असल्याचे स्पष्ट करण्यात आले. गावी गेलो, दिल्लीला गेलो किंवा लंडनला गेलो तरी विरोधक टीका करतात, असा टोला लगावण्यात आला. मात्र, प्रत्येक दौरा हा राज्याच्या कामासाठीच असतो, असे सांगत दौऱ्यांवरील टीकेला प्रत्युत्तर देण्यात आले.

7 वर्षांनी लेक घरी परतला! आई-वडिलांच्या आनंदाश्रूंनी फुललं घर

नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा गावातील बेपत्ता तरुण तब्बल 7 वर्षांनंतर सुखरूप घरी परतला. तमिळनाडूतील मदुराई येथील अक्षया ट्रस्टने मानसिक प्रकृती स्थिर झाल्यानंतर तरुणाचा शोध घेत त्याचे मूळ घर शोधून काढले. लेक घरी परतताच पाडवी कुटुंबाच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आणि आई-वडिलांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले.

UPI पेमेंटला व्यापाऱ्यांचा विरोध; QR कोड हटवण्यास सुरुवात

UPI व्यवहारांवर प्रस्तावित 0.4 टक्के शुल्क (MDR) आकारण्याच्या निर्णयाला उल्हासनगर आणि अंबरनाथमधील व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. या शुल्कामुळे व्यापारी आणि ग्राहक दोघांचेही नुकसान होणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

या निर्णयाच्या निषेधार्थ काही व्यापाऱ्यांनी दुकानांवरील UPI पेमेंटचे फलक आणि QR कोड हटवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ग्राहकांना पुन्हा रोखीने व्यवहार करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.व्यापाऱ्यांच्या मते, वस्तूंच्या विक्रीवर आधीच GST भरला जात असताना UPI व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क लावणे हा आणखी आर्थिक भार ठरेल. दररोज कोट्यवधींची उलाढाल असलेल्या उल्हासनगरातील व्यापाऱ्यांनी या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे.

एमबीबीएस डॉक्टरच सूत्रधार,  कोंढव्यात एमडी मेफेड्रोन विक्रीप्रकरणी पाच जणांवर कारवाई

कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एमडी मेफेड्रोन या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या आरोपींवर कोंढवा पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत पाच जणांकडून १०८.५१ ग्रॅम एमडी मेफेड्रोनसह एकूण ८ लाख २३ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोलिसांच्या तपास पथकाला गोपनीय माहिती मिळाल्यानंतर एनआयबीएम उंड्री रोड परिसरातील एका हॉटेलमध्ये छापा टाकण्यात आला. यावेळी करण जसवंतसिंग परदेशी (वय २९) याला ताब्यात घेण्यात आले.

अमित ठाकरे यांचा पुण्यात दोन दिवसीय गणेश मंडळ भेट दौरा

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे १९ आणि २० सप्टेंबर रोजी पुणे शहरातील गणेश मंडळांना भेटी देणार आहेत. दोन दिवसांत ते तब्बल ४१ गणेश मंडळांना भेट देत मानाच्या पाचही गणपतींसह विविध सार्वजनिक गणेश मंडळांचे दर्शन घेणार आहेत.

या दौऱ्यात मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधण्यासोबतच मनसे व मनविसे पदाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन गणरायाचे दर्शन घेणार आहेत. १९ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता राजमहाल येथून दौऱ्याला सुरुवात होणार असून, दुपारी कसबा गणपतीचे दर्शन घेण्यात येईल.

त्यानंतर केसरीवाडा, तुळशीबाग, गुरुजी तालीम, तांबडी जोगेश्वरी आणि दगडूशेठ हलवाई यांसह प्रमुख गणेश मंडळांना भेटी दिल्या जाणार आहेत. २० सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता दगडूशेठ हलवाई गणपतीपासून दुसऱ्या दिवसाच्या दौऱ्याला सुरुवात होईल.

चंद्रपूरात शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसचा मोर्चा

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात आज शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. पंचायत समिती येथून या मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात विजय वडेट्टीवार यांच्यासह त्यांची कन्या शिवानी वडेट्टीवारही सहभागी झाल्या होत्या. मोर्चाच्या माध्यमातून विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली

धुळे- पावसाअभावी करपलेली पिके घेऊन शिंदे गट धडकला तहसील कार्यालयात

बीड- दुष्काळ जाहीर करून नुकसानभरपाई आणि पीकविमा द्या

बीड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कापूस, सोयाबीन, बाजरी यांसह खरीप पिकांची अक्षरशः राखरांगोळी झाली आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ दुष्काळ जाहीर करून नुकसानीचे पंचनामे करावेत, शेतकऱ्यांना एकरी ४० हजार रुपये अर्थात हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी तसेच थकीत पीकविमा तात्काळ जमा करावा, अशी मागणी शेतकरी हक्क मोर्चाचे राजेंद्र आमटे यांनी केली.

मनोज जरांगे यांनी भाषा शुद्धीसाठी विद्यानंद बापट यांच्याकडे क्लास लावावे- लक्ष्मण हाके

मनोज जरांगे मोठा नेता आहे.त्यांना दिल्ली मध्ये जाऊन आंदोलन करायचं आहे

जरांगे आंदोलन म्हणजे तमाशा होता

Obc आरक्षण बेदखल आहे*आरक्षण संपत आहे

जरंगे म्हणजे बाटलीतलं भूत आहे

परळीत भटक्या कुत्र्यांचा हैदोस; ५० जणांना चावा

परळी शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यंत सुमारे ५० नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे नगरपरिषदेने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नेमकी कोणती कार्यवाही केली, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

भटक्या कुत्र्यांना पकडणे, बंदिस्त करणे अथवा त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून लाखो रुपयांचा खर्च होत असल्याचे सांगितले जाते. मात्र, एवढा खर्च करूनही शहरातील विविध भागांत कुत्र्यांची संख्या आणि नागरिकांवरील हल्ल्यांचे प्रकार कमी होत नसल्याने या खर्चाच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 50 लोकांना कुत्र्याने चावा घेतलेल्या नागरिक आणि मुलांना परळी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे

शिर्डीत मातंग समाजाचा एल्गार, सकल मातंग समाजाच्या वतीने महामोर्चा

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणासाठी महामोर्चा...

भाजपचे आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वात मोर्चा...

राज्यभरातील हजारो मातंग बांधव मोर्चात सहभागी...

शिर्डीत महामोर्चा आणि जाहीर सभेचे आयोजन...

SC आरक्षणाचे अ ब क ड उपवर्गीकरण तातडीने लागू करण्याची आग्रही मागणी

लातूरच्या उस्मानपुरात मध्यरात्री थरार परळीच्या युवकाची चाकू भोसकून हत्या

लातूरच्या उस्मानपुरात मध्यरात्री थरार परळीच्या युवकाची चाकू भोसकून हत्या

लातूर शहरातील उस्मानपुरा परिसरात आमिर हॉटेलसमोर बुधवारी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास दोन गटा मध्ये बाचाबाचीनंतर हाणामारी झाल्याची घटना घडली. या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळालीअसून, दोघे गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे .

धुळ्यात तऱ्हाडी शिवारात बिबट्याचा महिलेवर प्राणघातक हल्ला

धुळ्यात तऱ्हाडी शिवारात बिबट्याचा महिलेवर प्राणघातक हल्ला

तऱ्हाडी येथील ममाने शिवारात पहाटेच्या सुमारास बिबट्याने एका शेतकरी महिलेवर अचानक प्राणघातक हल्ला केल्याची थरारक घटना घडली आहे, या हल्ल्यातून ज्योती मोरे या बालबाल बचावल्या असून, त्यांनी दाखवलेल्या धैर्यामुळे आणि प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे,

कामरगावात आठ एकर सोयाबीनवर रोटावेटर फिरवलं

वाशिम जिल्ह्यात पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप हंगामातील सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला आहे. अपुऱ्या पावसामुळे सोयाबीनची वाढ खुंटली असून, अनेक शेतांमध्ये पीक अक्षरशः करपून गेले आहे. त्यामुळं वाशिमच्या कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील एका शेतकऱ्याने तब्बल आठ एकर क्षेत्रातील सोयाबीनच पीक हातात काहीच येणार नसल्याने रोटावेटर फिरवून नष्ट केलं आहे. डोळ्यांसमोर उभं केलेलं पीक नष्ट करण्याची वेळ आल्याने शेतकऱ्यावर मोठं आर्थिक संकट ओढवलं असून पावसाच्या खंडाचा शेतकऱ्यांच्या खरीप हंगामावर झालेला परिणाम पुन्हा एकदा समोर आला आहे. त्यामुळे या नुकसानीचा तात्काळ पंचनामा करून नुकसानभरपाई आणि आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

मोताळ्यात करपलेल्या पिकांची आमदार संजय गायकवाडांकडून पाहणी

मोताळ्यात करपलेल्या पिकांची आमदार संजय गायकवाडांकडून पाहणी

मोताळा तालुक्यात पावसाअभावी करपलेल्या खरीप पिकांची आमदार संजय गायकवाड यांनी बांधावर जाऊन पाहणी केली. कोथळी, निमखेड, धामणगाव देशमुख, रामगाव, पिंपळगाव नाथ, चिंचखेड नाथ, ईसलवाडी, गिरोली आदी गावांमध्ये अधिकाऱ्यांसह त्यांनी पीक नुकसानीचा आढावा घेतला. मका, तूर, सोयाबीन व कपाशी पिकांची पावसाअभावी झालेली अवस्था पाहून आमदार गायकवाड यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

दुष्काळी मदतीसाठी स्वराज्य पक्ष आक्रमक; हेक्टरी १ लाखांची मदत जाहीर करण्याची मागणी

बुलडाणा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर स्वराज्य पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये दुष्काळी मदत, अटी-शर्तीशिवाय कर्जमाफी आणि पिक विम्याचा लाभ देण्याची मागणी केली. जळगाव जामोद येथे प्रांत अधिकाऱ्यांसोबत शेतकऱ्यांची चर्चा झाली.

हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्प शाळेला अभिजीत दिपके यांची भेट

हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्प शाळेला अभिजीत दिपके यांची भेट

डचिरोलीच्या हेमलकसा येथील प्रसिद्ध लोक बिरादरी प्रकल्प शाळेला कॉकरोज जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांची भेट

हेमलकसा लोक बिरादरी प्रकल्प शाळेची पाहणी - कॉंकरोज जनता पार्टीचे अभिजीत दिपके यांनी घेतला आढावा - प्रतिनिधी गणेश शिंगाडे

जळगाव जिल्ह्यात सात धरणे तुडुंब

जळगावमधील पारोळा धरणात ३० व ३१ जुलैसह गेल्या आठवड्यातील पावसामुळे जलसाठा ५८ टक्क्यांवर पोहोचला आहे.

चाळीसगावच्या 'मन्याड'मध्ये येणारा पाण्याचा प्रवाह बंद झाला आहे. त्यामुळे 'मन्याड'मध्ये सध्या जेमतेम ४७ टक्के जलसाठा आहे.

नांदेड जिल्ह्यात पावसाअभावी शेती पिके करपली

नांदेड जिल्ह्यात मागील दीड महिन्यापासून पाऊस नाही. पावसा अभावी शेती पिके करपून गेली आहेत. जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती असताना नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी मात्र शेतीच्या बांधावर न जाता वातानुकूलित कार्यालयात दुष्काळ परिस्थितीचा आढावा घेतला.

सातारा-पुणे महामार्गावर भीषण अपघात २३ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

सातारा-पुणे महामार्गावर किकवी रात्री सुमारे नऊच्या सुमारास कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला.या अपघातात पिनाक शैलेश सूर्यवंशी यांचा जागीच मृत्यू झाला.पिनाक सूर्यवंशी हे कारमधून साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने एकटे प्रवास करत होते.किकवी हद्दीत त्यांच्या कारने पुढे जाणाऱ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की,त्यांचा जागीच मृत्यू झाला.अपघाता नंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला.त्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. अपघात नेमका कोणत्या कारणा मुळे झाला,हे पंचनामा आणि पुढील तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

अतिवृष्टीमुळे शेती खरडून गेली, नंतर सोयाबीनवर रोगराई आली, शेंगाच लागल्या नाही

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यात 31 जुलै रोजी अतिवृष्टी झाली होती त्यामुळे अनेकांच्या शेती खरडून गेल्यात, अति पावसामुळे सोयाबीनवर रोगराई पसरली व त्यामुळे सोयाबीनला शेंगाच लागल्या नाही... त्यामुळे अशा सोयाबीनवर रोटावेटर फिरवण्याचा कार्यक्रम आयोजित केला असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री राज्याचे कृषिमंत्री जिल्हाधिकारी यांना संग्रामपूर तालुक्यातील काकोडा येथील गणेश मानखैर या युवा शेतकऱ्याने आमंत्रित केलं आहे. रोटावेटर फिरवण्याचा कार्यक्रम संपल्यानंतर मी शेतकरी व अन्नदाता असल्याने यावेळी भोजनाचही आयोजन करण्यात आलं आहे. अशी आर्त हाक या शेतकऱ्याने व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे... सध्या हा व्हिडिओ समाज माध्यमात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

नागपूर विद्यापीठात शिक्षण महागले, शुल्कात ७ टक्के वाढ

- नागपूर विद्यापीठात शिक्षण महागले, शुल्कात ७ टक्के वाढ, शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी सुधारित शुल्काची अधिसूचना जारी

- यंदा प्रथम सत्रात प्रवेश घेणाऱ्या नव्या विद्यार्थ्यांवर शुल्कवाढीचा भार,ननव्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी ७ टक्के शुल्कवाढ लागू

- संगणक ‘कोअर सब्जेक्ट’ नसलेल्या विद्यार्थ्यांकडून १,२०० रुपये अतिरिक्त शुल्क, संगणक प्रशिक्षणाच्या नावाखाली १,२०० रुपये आकारण्यावर विद्यार्थी-शिक्षकांकडून प्रश्नचिन्ह

E-Waste मधून साकारला घरगुती गणपती बाप्पा, तळेगावच्या ऋषिकेशचा पर्यावरणपूरक अनोखा उपक्रम......

तळेगाव दाभाडे येथील गणेशभक्त ऋषिकेश कुलकर्णी यांनी यंदाच्या गणेशोत्सवात चक्क E-Waste आणि जुन्या कॉम्प्युटर पार्ट्सपासून गणपती बाप्पाची अनोखी मूर्ती आणि देखावा साकारला आहे. विशेष म्हणजे, हा देखावा पूर्ण करण्यासाठी जवळपास एक महिन्याचा कालावधी लागला असून, संपूर्ण कुलकर्णी कुटुंबाने उत्साहाने सहभाग घेतला. गेल्या २५ वर्षांपासून कॉम्प्युटर शोरूम आणि IT व्यवसायाशी जोडलेले असल्याने विविध वर्षांत जमा झालेल्या जुन्या आणि वापरात नसलेल्या कॉम्प्युटर पार्ट्सचा कल्पकतेने पुनर्वापर करण्यात आला. उपलब्ध साहित्याची निवड, रचना, मूर्तीला आकार देणे आणि सजावट अशा प्रत्येक टप्प्यातून ही अनोखी कलाकृती साकारली. जे टाकाऊ वाटतं, त्यातूनही सुंदर निर्मिती होऊ शकते’, हा संदेश देत E-Waste कडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन या देखाव्यातून मांडण्यात आला आहे.

रत्नागिरी- ऐन गणेशोत्सवात राज्य उत्पादन शुल्क शाखेची मोठी कारवाई

अवैध सुरु असलेल्या गोवा बनावटीच्या मिनी दारू कारखान्यावर छापा

राजापूर तालुक्यातील तळगांव इथं राज्य उत्पादन शुल्क शाखेच्या रत्नागिरी सिंधुदूर्ग भरारी पथकाची कारवाई

कारवाईमध्ये १ कोटीचा गोवा बनावटीच्या दारूचा साठा जप्त

या प्रकरणी जागा मालक दिनेश जैतापकर आणि गोव्यातील चंदन पाटील यांना घेतलं ताब्यात

डुप्लीकेट गोवा बनावटीची दारू तयार करण्याचा हा मिनी कारखाना राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून उघड

ताब्यात घेतलेल्या दोघांना न्यायालयात करणार हजर, गणेशोत्सवात मोठी कारवाई

गावठी पिस्तूल बाळगणारा तरुण सासवड पोलिसांच्या ताब्यात

चंदन टेकडीजवळ के.के. पेढा दुकानाच्या पाठीमागे संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या तरुणाकडून गावठी पिस्तूल जप्त करण्यात सासवड पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आले. ही कारवाई १६ सप्टेंबर रोजी करण्यात आली.

शुभम सतीश कामथे (वय २५, रा. शिवरी, ता. पुरंदर, जि. पुणे) हा चंदन टेकडी परिसरात संशयास्पदरीत्या आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने असमाधानकारक उत्तरे दिल्याने त्याला चारचाकी वाहनासह पोलीस ठाण्यात आणण्यात आले. अधिक चौकशी केली असता त्याच्याकडे अवैध अग्निशस्त्र असल्याचे समोर आले.

हळदीच्या पावलांनी गौराईचं मोठ्या उत्साहात आगमन 

तळकोकणात आज गौराईचे मोठ्या उत्साहात वाजतगाजत आगमन झाले. सवाष्ण महिला पाणवठ्याच्या ठीकाणी जाऊन गौराईचं आवाहन करतात. हळदिचे रोप, आगाडा, तिरडा, लालमाठ, हरणाच्या फुलांचे रोप एकत्र करुन प्रतिकात्मक गौराईचे आगमन होतं. तळकोकणात पाणवठ्याच्या ठिकाणाहून गौरी आगमनाची मोठी परंपरा आहे. हळदिच्या पावलांनी वाजतगाजत मोठ्या उत्साहात गौराईला घरी आणलं जातं. यावेळी गौराईला नटवून सजवून तिची ओठी भरण्यात येते व वंश वाढीसाठी साकडे घातले जाते. दुपारनंतर जमलेल्या महीला एकमेकींना 'ओवसा' देतात व त्यानंतर मंगळागौर, फुगड्यांचा कार्यक्रम होतो. माहेरवाशीणीला आजच्या दिवशी विशेष मान दिला जातो. अशा आगळ्यावेगळ्या व पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात कोकणात गौराईचे पुजन केले जाते.

शिरूर शहर गोळीबाराने हादरले; लाटेआळीत तरुणाचा जागीच मृत्यू

शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज सकाळी साडेसहाच्या सुमारास गोळीबार झाला. या घटनेत हरी गंगावणे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, गणेशोत्सवाच्या काळात घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

धाराशिवसह परिसरात मध्यरात्री हलक्या स्वरूपाचा पाऊस

धाराशिव मध्ये गेल्या दीड महिन्याहून अधिक काळापासून दडी मारलेला पावसाने मध्यरात्री आगमण केले,हलक्या स्वरूपाच्या सरी जिल्ह्यामध्ये बरसल्या.जमिनीची तहान मोठी आहे पडलेला पाऊस अतिशय तुटपुंजा आहे. या पाऊस आणि ती तहान भागली जाणार नाही. मात्र पूर्णपणे पाठ फिरवलेल्या पावसाचे गौराईसह आगमन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये काहीसे समाधानाचे संकेत आहेत. पुढील काळात मोठा पाऊस होऊन दुष्काळ धुवून निघावा अशी भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. मध्यरात्री हलक्या स्वरूपाच्या सरी बरसल्या.चातकाप्रमाणे शेतकरी चांगल्या पावसाची वाट पाहत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपुरात ७६ फुटांचा केक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपुरात भाजपच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शहरातील गांधी चौक येथे आमदार सुधीर मुनगंटीवार व महापौर संगीता खांडेकर यांच्या उपस्थितीत तब्बल ७६ फुटांचा केक कापण्यात आला. या विशेष केकचे कटिंग ३६ विद्यार्थिनींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गडचिरोलीत 45 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त - एकाला अटक

गडचिरोलीमधून मोठी बातमी! स्थानिक गुन्हे शाखा आणि आरमोरी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत 45 लाख 20 हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त केला आहे. कुरखेडा ते आरमोरी रोडवर आयशर ट्रक क्रमांक CG 08 Z 8792 मध्ये लपवून हा गुटखा वाहतूक होत होती.

भररस्त्यात बिबट्याचा वावर; कठड्यावर बसलेल्या बिबट्यामुळे नागरिकांमध्ये भीती

शिरूर तालुक्यातील करडे येथे रात्री भररस्त्यालगतच्या कठड्यावर बिबट्या शांतपणे बसलेला दिसला. बिबट्याचा शेतशिवाराच्या रस्त्यांवर वाढता वावर पाहता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com