Manoj Jarange : २०२९ मध्ये महायुतीचा बदला घेणार; मनोज जरांगेंचा इशारा

Manoj jarange warns mahayuti over 2029 elections : मला एकटं पाडण्याचा कट सरकारकडून रचला जात असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. तसेच २०२९ मध्ये महायुतीचा बदला घेऊ, असा इशाराही त्यांनी दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुती सरकारविरोधात मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील प्रचंड आक्रमक झाले. त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह महायुतीवर गंभीर आरोप करतानाच, गंभीर इशाराही दिला. मला एकटं पाडण्यासाठी सरकारकडून कट रचला जात असल्याचं सांगतानाच, आयुष्यात कधी बघितला नसेल असा बदला २०२९ मध्ये घेऊ, असा इशाराही जरांगेंनी महायुतीला दिला.

कुणबी प्रमाणपत्र मिळाले, कुणबी प्रमाणपत्र धोक्यात हे असे सरकारने जाणूनबुजून पेरले आहे. मी एकटा पडावा म्हणून हा मोठा कट रचण्यात आला आहे. राज्यातील मराठा समाजाच्या लोकांसमोर मी ते सिद्ध करणार आहे. मला एकटं पाडण्याचा प्रयत्न का केला आणि माझ्या मराठा समाजाचं वाटोळं करण्याचं काम सरकार कसं करतंय हे मी सिद्ध करून देणार आहे. एखादी चूक मराठ्यांकडून झाली असेल तुम्हाला निवडून देण्याची; पण २०२९ मध्ये आम्ही आहोतच. तुमच्या आयुष्यात कधी बघितला नसेल असा बदला घेऊ, असे मनोज जरांगे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com