Manoj Jarange Patil Saam tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil :...तर कुणालाही सोडणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा रोख कुणाकडे?

Manoj Jarange Patil on Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मुद्यावरून सत्ताधाऱ्यांना मोठा इशारा दिलाय.

डॉ. माधव सावरगावे

जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणारवरून सत्ताधाऱ्यांना मोठा इशारा दिला आहे. मराठा समाजाच्या मागण्यासाठी जीव जाळतोय, आम्हाला आरक्षण दिलं नाही तर कुणालाही सोडणार नाही, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

आज जालन्याचे काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. मराठा आरक्षणाच्या मागणीवर भाष्य करताना जरांगे पाटील म्हणाले, 'आमची लेकरे मोठी झाली पाहिजे. यासाठी आम्ही जीवाची बाजी लावतोय. आम्ही दिलेल्या व्याख्येनुसार सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी, आमच्या मागण्या पूर्ण कराव्या यासाठीच आम्ही जाीव जाळतोय. आम्हाला आरक्षण दिलं नाही तर कुणालाही सोडणार नाही. मी एवढा विरोध मराठ्यांसाठी करत आहे. आम्हाला दुसरे काही अपेक्षित नाही'.

खासदार कल्याण काळे यांच्या भेटीवर बोलताना जरांगे पाटील म्हणाले, 'ते कशासाठी आले होते, मला माहीत नाही. काँग्रेसने मराठ्यांची मते घेतली, निवडून आले. तर आमच्या विरोधात वडेट्टीवार बोलतात. त्याबद्दल मी काळे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. उपोषणाच्या काळात मागण्या पूर्ण करा. त्यानंतर आमचा रोष परवडणारा नाही'.

'आम्हाला मेरपर्यंत आरक्षणाची अपेक्ष सरकारकडून राहील. आम्हाला मरेपर्यंत आरक्षणाची अपेक्षा सरकारकडून राहील. सरकार आमच्या मागण्यांबाबत दुटप्पीपणा करत आहे. आता यांची थोडी फजिती झाली आहे. विधानसभा निवडणुकीत जास्त फजिती होईल, असे जरांगे पाटील म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या विमानाला अपघात कसा झाला? संपूर्ण घटनाक्रम समोर

Pohe Veg Lollypop : संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा कुरकुरीत पोहे व्हेज लॉलिपॉप, वाचा रेसिपी

Ajit Pawar Death : अजित पवारांच्या विमानाचे दोन तुकडे, जिकडे तिकडे धूर अन् आगीचे लोळ, अपघाताचे Photos

Ajit Pawar Passed Away: खासदार ते सहा वेळा उपमुख्यमंत्री; अशी राहिली अजित पवारांची राजकीय कारकिर्द!

Maharashtra Live News Update: अजितदादा एक निर्भीड व स्पष्ट व्यक्तिमत्व मंत्री-- भरत गोगावले

SCROLL FOR NEXT