Manoj Jarange Patil: मामा-भाच्याचं अतूट प्रेम; मनोज जरांगे पाटलांसोबत संदिपान भूमरे खंबीरपणे उभे; विलास भूमरे नेमकं काय म्हणाले?

Vilas Bhumre Met Manoj Jarange Patil In Antarwali Sarathi: मराठा समाजाच्या आरक्षणात सगे सोयरेच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटीत आमरण उपोषण करीत आहे. काल त्यांची भेट विलास भूमरे यांनी घेतली आहे.
मनोज जरांगे पाटील
Manoj Jarange PatilSaam Tv
Published On

अक्षय शिंदे, साम टीव्ही जालना,

आंतरवाली सराटीत छत्रपती संभाजीनगरचे नवनिर्वाचित खासदार संदिपान भूमरे यांचे पुत्र विलास भूमरे यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आहे. जरांगे पाटील आणि भुमरे साहेबांचं मामा -भाच्याचं अतूट प्रेम आहे. भाच्यासोबत मामा खंबीरपणे उभे राहतील, जरांगे पाटलांच्या मागण्यासाठी सरकार देखील सकारात्मक असल्याचं विलास भूमरे यांनी सांगितलं आहे. एकनाथ शिंदे मराठा आरक्षणाचा तिढा लवकरच सोडवतील, असा विश्वास देखील विलास भूमरे यांनी व्यक्त केला आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणात सगे सोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पुन्हा एकदा आमरण उपोषण (Antarwali Sarathi) सुरू केलं आहे. मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये सगेसोगरे अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी करावी. मराठा समाजाला सरकारने ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं, अशी मागणी जरांगे पाटलांनी केली आहे.

मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला ८ जूनपासून पुन्हा सुरूवात झाली आहे. काल जरांगे पाटलांच्या उपोषणाचा दुसरा दिवस होता. तेव्हा छत्रपती संभाजीनगरचे नवनिर्वाचित खासदार संदिपान भूमरे यांचे पुत्र विलास भूमरे यांनी भेट घेतली (Vilas Bhumre Met Manoj Jarange Patil) आहे. सगे सोयरे अधिसुचनेच्या अंमलबजाणीच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीत आमरण उपोषण करत आहे. आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे.

मनोज जरांगे पाटील
Manoj Jarange Patil : 'आरक्षण दिलं नाही तर, एकही आमदार निवडून येणार नाही'; फडणवीसांच्या विधानानंतर जरांगेंचा इशारा

दरम्यान राज्यातील अनेक नेते त्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा देत आहे. काल रात्री संभाजीनगरचे नवनियुक्त खासदार संदिपान भूमरे यांचे पुत्र विलास भूमरे (Sandipan Bhumre Son Vilas Bhumre) यांनी अंतरवाली सराटीत येऊन जरांगे यांची भेट घेतली आहे. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला (Manoj Jarange Patil Hunger Strike) आहे. दरम्यान जरांगे पाटलांच्या मागण्यासाठी सरकार सकारात्मक असून स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लक्ष घालून तिढा सोडवतील, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केलाय.

मनोज जरांगे पाटील
Manoj Jarange Patil: मराठ्यांना त्रास देणाऱ्या नेत्यांना पहिल्या खपक्यातच पाडणार; मनोज जरांगे कडाडले

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com