Manoj Jarange Patil and Chhagan Bhujbal Saam Digital
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील विधानसभा लढवणार? भुजबळांचं आव्हान स्वीकारणार? 29 ऑगस्टला होणार स्पष्ट

Manoj Jarange Patil Vs Chhagan Bhujbal: विधानसभा निवडणुकीपूर्वी जरांगे विरुद्ध भुजबळ संघर्ष चांगलाच रंगलाय. त्यातच आता जरांगेंनी 113 आमदार पाडण्याचा इशारा दिल्यानंतर भुजबळांनीही जरांगेंना 8 आमदार तरी निवडून आणण्याचं आव्हान दिलंय.

Saam Tv

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर 288 जागा लढवण्याचा निर्धार मनोज जरांगेंनी केलाय. त्यातच आता 288 नाही तर 88 जागा लढवून त्यापैकी किमान 8 जागा तरी निवडून आणाव्यात, असं आव्हानच मंत्री छगन भुजबळांनी दिलंय. तर जरांगेंनी अप्रत्यक्षरित्या छगन भुजबळांनी दिलेलं आव्हान स्वीकारत असल्याचे संकेत दिलेत.

लोकसभेला जरांगे फॅक्टरने महायुतीची दाणादाण केली. त्यानंतर जरांगेंचा आत्मविश्वास चांगलाच वाढलाय. त्यातच आता राज्यातील 113 आमदारांना पाडणार असल्याचा इशारा जरांगेंनी दिला होता.

त्यानंतर भुजबळांनीही जरांगेंना उत्तर देतांना विधानसभा लढवण्याचं आव्हानच दिलंय. एवढंच नाही तर विधानसभेच्या 88 जागा आरक्षित असून त्याचीही जरांगेंना माहिती नसल्याची खिल्ली उडवलीय.

लढायचं की पाडायचं? याची रणनीती 29 ऑगस्टला ठरवणार असल्याचं मनोज जरांगेंनी म्हटलंय. मात्र जरांगे भुजबळांचं आव्हान स्वीकारून विधानसभेच्या रिंगणात उतरणार की लोकसभेप्रमाणे महायुतीचा गेम करणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Director Death: प्रसिद्ध दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; तीन राष्ट्रीय पुरस्कारांनी झाले होते सन्मानित, मनोरंजन विश्वावर शोककळा

Mental Health Tips : सतत उदास आणि निराश वाटतंय? या आजाराची आहेत ही गंभीर लक्षणे

Cancer Awareness : दररोज फक्त करा 'हा' एक व्यायाम कॅन्सर तुमच्यापासून राहील दूर; आजपासून करा सुरुवात

उपचारासाठी दर्ग्यात गेली, पण अत्याचाराला बळी पडली; मौलवीचा महिलेसोबत संतापजनक प्रकार

Monday Horoscope : सोमवार ठरणार भाग्याचा! ‘या’ 6 राशींना नोकरी-व्यवसायात मोठा फायदा; वाचा उद्याचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT