Maharashtra Politics : मोठी बातमी! राज ठाकरे आणि मनोज जरांगे एकाच दिवशी पुणे दौऱ्यावर, राजकीय वर्तुळाचं लक्ष

Raj Thackeray And Maratha Aandolak Manoj Jarange On Pune Visit : राज ठाकरे आणि मनोज जरांगे एकाच दिवशी पुणे दौऱ्यावर आहेत. त्यामुळे सगळ्या राजकीय वर्तुळाचं लक्ष आज या दौऱ्याकडे लागलेलं आहे.
राज ठाकरे आणि मनोज जरांगे
Raj Thackeray And Maratha Aandolak Manoj JarangeSaam Tv
Published On

सागर आव्हाड, साम टीव्ही पुणे

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोघेही आज पुणे दौऱ्यावर आहेत. एकाच दिवशी जरांगे पाटील आणि राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली आज पुण्यात आहेत. तर मनसेचं आगामी निवडणुकीसाठी महाराष्ट्र मिशन सुरू आहे.

ठाकरे गट आणि मनसेत राडा

बीडमध्ये मराठा आंदोलकांनी राज ठाकरे (MNS Leader Raj Thackeray) यांचा निषेध केल्याचं दिसलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे बीड जिल्हा दौऱ्यावर असताना ठाकरे गटाचे शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये मोठा राडा होता. जालना रोड परिसरात राज ठाकरे दाखल होताच त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यासमोर हा राडा झाला होता. मराठा आरक्षणाला विरोध केलामुळे दोन्ही गटात तणाव निर्माण झाला होता. यावेळी आंदोलकांनी राज ठाकरे यांच्या ताफ्याच्या गाड्यांवर सुपाऱ्या फेकल्या (Vidhan Sabha Election) होत्या. त्यामुळे वातावरण तापले होते, तर मनसे सैनिक आक्रमक झाल्याचे दिसले होते.

राज ठाकरेंचा पुणे दौरा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं पुण्यात घर आहे. मात्र, राज ठाकरे पुण्यातील घरी न थांबता एका पंचतारांकित हॉटेलमधे मुक्कामाला थांबलेत. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तिथे पाहायला मिळतोय. राज यांच्या मराठवाडा दौऱ्यात त्यांना विरोध झाला (Maratha Reservation) होता. ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही राज ठाकरे यांच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकून निषेध नोंदवला होता. राज ठाकरे पुण्यात असताना जरांगे आज यावर काय प्रतिक्रिया देतात? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

राज ठाकरे आणि मनोज जरांगे
Manoj Jarange Patil : विधानसभेसाठी अखेर डाव टाकला, मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेने राजकीय पक्षांचं टेन्शन वाढणार, VIDEO

जरांगे पाटलांचं मराठा आंदोलकांना आवाहन

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या रॅलीचं आज पुण्यात आयोजन केलेलं आहे. सारसबाग येथील गणपतीचे दर्शन आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकास अभिवादन करून रॅलीला सुरुवात होणार आहे. तर डेक्कन परिसरातील छत्रपती संभाजी महाराज स्मारकास अभिवादन केल्यानंतर रॅलीची सांगता होणार आहे.

मराठा आरक्षणाचा मुद्दा आगामी विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरणार असल्याचं दिसत आहे. कुठलाही नेत्याला अडवू नका, राज्यात आपलं आंदोलन सुरू नाही. जाब विचारायचा असेल तर मुंबईत जावून विचारू, असं आवाहन मराठा आंदोलकांना जरांगे पाटलांनी केलंय.

राज ठाकरे आणि मनोज जरांगे
Manoj Jarange: साताऱ्याच्या सभेत मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली, भाषणावेळी हात थरथरले, स्टेजवरच खाली बसले, VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com