Ladli Lakshmi Yojana: लाडकीला उत्तर देण्यासाठी मविआची 'महालक्ष्मी'; 'लाडकी बहीण' विरुद्ध 'महालक्ष्मी'

Ladli Lakshmi Yojana vs Ladki Bahin yojana : विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारच्या लाडकी बहीण महत्त्वाकांक्षी योजनेला उत्तर देण्यासाठी मविआ सरकार महालक्ष्मी योजना आणणार असल्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलीय. लाडकी बहीण योजनेच्या दुप्पट पैसे महिलांना देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे मविआला महालक्ष्मी तारणार का? पाहूया एक खास रिपोर्ट.
Ladli Lakshmi Yojana: लाडकीला उत्तर देण्यासाठी मविआची 'महालक्ष्मी'; 'लाडकी बहीण' विरुद्ध 'महालक्ष्मी'
Ladli Lakshmi Yojana vs Ladki Bahin yojana
Published On

राज्यात महायुतीनं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर लाडकी बहीण योजना आणली. या योजनेसाठी पैसा कुठून आणणार असा सवाल मविआनं सरकारला वारंवार केला. वित्त विभागनंही याबाबच नाराजी व्यक्त केली. मात्र आता मविआनंही निवडणूक जिंकण्यासाठी यापेक्षा दुप्पट पैसे देणा-या महालक्ष्मी योजनेची घोषणा केलीय. मविआ सत्तेत आल्यास कर्नाटकाच्या धरतीवर महालक्ष्मी योजना आणणार असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सांगितलं.

तर लाडकी बहीणविरोधात कोर्टात जाणा-या काँग्रेसला योजनेचे महत्त्व काय कळणा? असा सवाल भाजपनं केलाय. लाडकी बहीणला टक्कर देण्यासाठी काँग्रेसनं कर्नाटकातली ज्या गृहलक्ष्मी योजनेचा आधार घेतलाय ती नेमकी काय आहे ते पाहूयात.

कर्नाटकातील गृहलक्ष्मी योजना काय?

कर्नाटकात गृहलक्ष्मी योजनेची काँग्रेसकडून सुरुवात

योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 2 हजार रुपये

आर्थिकदृष्ट्या वंचित व्यक्तींना भरीव आधार

दारिद्र्य रेषेखालील महिलांसाठी योजना

2 हजार रूपये थेट महिलांच्या खात्यात जमा

राज्य सरकारवर साडे सात लाख कोटींचं कर्ज आहे. मात्र सत्ता मिळवण्यासाठी निवडणुकांच्या तोंडावनर नेहमीच लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडला जातो. लाडकी बहीणबाबत विरोधकांनी अशीच टीकेची झोड उठवली होती. मात्र या लडकी बहीणची धडकी भरल्यामुळेच आता मविआही त्याच मार्गावर जात असल्याचं दिसतंय. मात्र महायुतीच्या लाडकी बहीणवर मविआची महालक्ष्मी भारी ठरणार का? याकडेच सा-यांचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com