Pune News: ससूनच्या डीनला रुग्णालयातील वार्डची संख्याच माहित नाही, दादा गायकवाडांचं मोठं वक्तव्य

Pune Sassoon Hospital News: गेल्या आठ दिवसापासून ससून हॉस्पिटल बाहेर बेवारस पेशंटचा हिशोब मिळावा यासाठी दादा गायकवाड यांचा आमरण उपोषण सुरू आहे. आज आठव्या दिवशी उपोषण सोडवण्यासाठी ससूनचे डीन एकनाथ पवार व अधीक्षक यलप्पा जाधव गेटवर आले होते.
पोर्श कार प्रकरणानंतर सलग दुसऱ्यांदा ससून रुग्णालयाचे डीन बदलले, आता कोणाला मिळाली जबाबदारी?
Pune Sassoon Hospital NewsSaam TV
Published On

गेल्या आठ दिवसापासून ससून हॉस्पिटल बाहेर बेवारस पेशंटचा हिशोब मिळावा यासाठी दादा गायकवाड यांचा आमरण उपोषण सुरू आहे. आज आठव्या दिवशी उपोषण सोडवण्यासाठी ससूनचे डीन एकनाथ पवार व अधीक्षक यलप्पा जाधव गेटवर आले होते. यावेळी उपोषणकर्त्यांशी डीन एकनाथ पवार यांनी संवाद साधला.

यावेळी तुम्ही उपोषण मागे घ्यावं, अशी विनंती एकनाथ पवार यांनी गायकवाड यांना केली. त्यावेळी दादा गायकवाड यांनी त्यांना ससून रुग्णालयात किती वॉर्ड किती आहेत? एवढेच मला सांगा, असा प्रश्न केला.

पोर्श कार प्रकरणानंतर सलग दुसऱ्यांदा ससून रुग्णालयाचे डीन बदलले, आता कोणाला मिळाली जबाबदारी?
WWE स्टार जॉन सीना निघाला Shah Rukh Khan चा फॅन, 'भोली सी सूरत' हे सुपरहिट गाणं गायलं; VIDEO व्हायरल

यावेळी एकनाथ पवारांना उत्तर देता आलं नाही. जर तुम्ही ससूनचे डीन आहात तर तुम्हाला वॉर्ड किती आहेत, हे माहिती नाही, मग तुम्ही इतर लोकांवर ती कारवाई कशी करणार? असाही प्रश्न उपस्थित केला.

पोर्श कार प्रकरणानंतर सलग दुसऱ्यांदा ससून रुग्णालयाचे डीन बदलले, आता कोणाला मिळाली जबाबदारी?
Kalyan Politics : ठाण्यात आमनेसामने अन् कल्याणमध्ये एकमत; मनसे आणि ठाकरे गटाचा सफाई कामगारांच्या मागणीला पाठिंबा

तुम्हाला रुग्ण किती गायब आहेत, किती अॅडमिट आहेत, हे सुद्धा माहिती नाही. त्यामुळे मला न्याय कसा मिळेल, माझी मागणी एकनाथ पवार आणि यलप्पा जाधव यांच्यावर कारवाईची आहे. मी दिलेल्या मागण्या तुम्ही लेखी पात्रामध्ये दिलेल्या नाहीत. तुम्ही यल्लाप्पा जाधव यांना पाठीशी घालत आहात. एक मोठा रॅकेट ससूनमध्ये सुरू असल्याचा आरोप दादा गायकवाड यांनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com