Kalyan Politics : ठाण्यात आमनेसामने अन् कल्याणमध्ये एकमत; मनसे आणि ठाकरे गटाचा सफाई कामगारांच्या मागणीला पाठिंबा

kalyan political news : कल्याणमध्ये कामगारांच्या प्रश्नाने राजकारण तापलं आहे. कल्याणमधील सफाई कामगारांच्या प्रश्नांसाठी सर्व पक्षीय नेते एकत्र आले आहेत. मनसे आणि ठाकरे गट देखील एकत्र आला आहे.
ठाण्यात आमनेसामने अन् कल्याणमध्ये एकत्र; कामगारांसाठी मनसे आणि ठाकरे गटाची एकमेकांना साथ, चर्चांना उधाण
Kalyan PoliticsSaam tv
Published On

अभिजीत देशमुख, साम टीव्ही प्रतिनिधी

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधील २७ गावातील सफाई कामगारांना पालिकेत समाविष्ट करुन घेण्याच्या मागणीसाठी त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आज या २७ गावातील सफाई कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारत केडीएमसी मुख्यालयावर मोर्चा काढला. या आंदोलनाला सर्व पक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला. मनसे आमदार राजू पाटील, माजी आमदार सुभाष भोईर, शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड, काँग्रेस पदाधिकारी संतोष केने यांच्यासह सर्व पक्षीय नेत्यांनी पालिका आयुक्त इंदूराणी जाखड यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कामगारांची मागणी प्रशासनाने मान्य करावी, अशी मागणी केली

कल्याण डोंबिवली महापालिकेलजवळील गावे ही जून २०१५ साली महापालिकेत समाविष्ट करण्यात आली आहे. या गावातील सफाईचे काम करणारे सर्व कामगार हे ग्रामपंचायतीत कार्यरत होते. गावे महापालिकेत समाविष्ट केली आहे. मात्र, या सफाई कामगारांना महापालिकेच्या सेवेत समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी तेव्हापासून केली जात आहे. गेली ९ वर्ष या मागणीबाबत पाठपुरावा सुरू आहे. मात्र या सर्व ५०० सफाई कामगारांना महापालिकेने अद्याप सेवेत समाविष्ट करुन घेतलेले नाही. त्या विरोधात आज २७ गावातील सफाई कामगारांनी पालिका मुख्यालयावर मोर्चा काढला.

kalyan politics
KalyanSaam tv

शिंदे गटाचे प्रमुख महेश गायकवाड त्यांच्या नेतृत्वाखाली कामगारांचा मोर्चा केडीएमसी मुख्यालयावर पोहोचला. आंदोलनास मनसे आमदार राजू पाटील, ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष भोईर ,काँग्रेसचे पदाधिकारी संतोष केने ,सर्वपक्षीय संघर्ष समितीचे पदाधिकारी गुलाब वझे यांनी पाठिंबा दिला. या नेत्यांच्या शिष्टमंडळाने केडीएमसी आयुक्तांची भेट घेतली. याबाबत बोलताना माजी आमदार सुभाष भोईर यांनी या २७ गावातील कामगारांना केडीएमसीत सहभागी करून घ्यावे, या मागणीसाठी १२ एप्रिल २०१७ साली सरकारकडे मागणी केली.

ठाण्यात आमनेसामने अन् कल्याणमध्ये एकत्र; कामगारांसाठी मनसे आणि ठाकरे गटाची एकमेकांना साथ, चर्चांना उधाण
Kalyan News : घरात कोणी नसताना शाळकरी मुलाचे टोकाचे पाऊल; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती आली समोर

२०१९ साली देखील हा विषय सरकारकडे मांडला होता. याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी देखील या आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला. कल्याणमधील कामगारांचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत त्यांना मनसे पाठिंबा आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. या गावातील नागरिकांकडून कर वसूली केली जाते. मात्र, त्यांना कोणत्या सोयी सुविधा पुरविल्या जात नाही. २७ गावांवर सातत्याने अन्याय होत राहिला आहे. सफाई कामगारांची मागणी लवकर मान्य करा, अशी मागणी करण्यात येत आहे.

ठाण्यात आमनेसामने अन् कल्याणमध्ये एकत्र; कामगारांसाठी मनसे आणि ठाकरे गटाची एकमेकांना साथ, चर्चांना उधाण
Kalyan Dombivli : ३ महायुती, १ मनसे, चारही विधानसभा मतदारसंघात राजकीय झुंबड, महायुती अन् मविआचा कस लागणार!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com