Kalyan News : घरात कोणी नसताना शाळकरी मुलाचे टोकाचे पाऊल; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती आली समोर

Kalyan News : कोळसेवाडी पोलिसांनी एडीआर दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तक्रार प्राप्त झाल्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल असे पोलिसांचे म्हणणे
Kalyan News
Kalyan NewsSaam tv
Published On

अभिजित देशमुख 
कल्याण
: शाळेच्या शिक्षिका आणि मुलाने चिडवल्यामुळे एका १३ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना कल्याण पूर्व कोळशेवाडी परिसरात घडली. या प्रकरणी कोळशेवाडी पोलिसानी एडीआर दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे. या प्रकरणी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी यांनी कोळशेवाडी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत या आत्महत्येप्रकरणी जबाबदार असलेल्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

Kalyan News
KDMC News : केडीएमसीच्या २७ गावांतील कर्मचाऱ्यांचे काम बंद; मुख्यलयावर मोर्चा काढत दिला इशारा

कल्याण (Kalyan) पूर्वेतील कोळसेवाडी शिवाजी कॉलनी चिकणी पाडा परिसरात प्रमोदकुमार पात्रा हे पत्नी, मुलगा विघ्नेश व मुलीसह राहतात. विघ्नेश काटेमानिवली परिसरातील एका नामांकित शाळेत आठवी इयत्तेत शिक्षण घेत होता. दरम्यान रविवारी प्रमोद कुमार कामावर गेले होते. तर त्याची आई आणि बहिण कामानिमित्त बाहेर गेली होती. यावेळी विग्नेशन याने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घरी परतताच मुलाचा मृतदेह पाहून त्यांना धक्का बसला. घटनेची माहिती मिळताच कोळसेवाडी (Police) पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मुलाचा मृतदेह खाली उतरवून पोस्टमार्टमसाठी पाठविला. 

Kalyan News
Bhandara News : नाश्त्याच्या पोह्यांमध्ये मुंग्या आणि किडे आढळले; तुमसरमधील हॉटेलमध्ये धक्कादायक प्रकार!

काय आहे सुसाईड नोटमध्ये 

मुलाजवळ एक सुसाईड नोट आढळून आली आहे. यामध्ये वडिलांनी मोठ्या बहिणीवर रागावू नये. माझ्या जाण्याने तुमचा खर्च कमी होईल. शाळेतील एक शिक्षिका आणि एक मुलगा त्याला चिडवित होते. यामुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख सुसाईड नोटमध्ये केला आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी एडीआर दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तक्रार प्राप्त झाल्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल असे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणी कल्याण काँग्रेसच्या महिलाध्यक्ष कांचन कुलकर्णी यांनी पोलिसांची भेट घेत  विघ्नेशला मानसिक त्रास देणारया विरोधात कठोर कारवाई  करावी अशी मागणी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com