KDMC News : केडीएमसीच्या २७ गावांतील कर्मचाऱ्यांचे काम बंद; मुख्यलयावर मोर्चा काढत दिला इशारा

Kalyan News : महानगर सफाई कर्मचारी संघ, शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली २७ गावातील शेकडो कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी केडीएमसी मुख्यालयावर मोर्चा काढला
KDMC News
KDMC NewsSaam tv
Published On

अभिजीत देशमुख
कल्याण
: कल्याण- डोंबिवली महापालिका क्षेत्रातील २७ गावांमधील सफाई कामगारानी आक्रमक पवित्रा घेतला आहे. केडीएमसीच्या सेवेत समाविष्ट करून घेण्याच्या मागणीसाठी केडीएमसीमधील २७ गावातील सफाई कर्मचाऱ्यांनी महानगर सफाई कर्मचारी संघ , शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आज काम बंद धरणे आंदोलन केले. तसेच केडीएमसी मुख्यालयावर मोर्चा काढत मागण्या मान्य न झाल्यास महापालिका अधिकाऱ्यांना घराबाहेर पडू देणार नाही, तसेच महापालिकेच्या कार्यालयांना टाळे ठोकू असा इशारा केडीएमसीला दिला.

KDMC News
Ganesh Festival : डोंबिवलीतील गृहसंकुलाची पर्यावरण संरक्षणासाठी साद; सोसायटीत सर्व कुटुंब बनवताय बाप्पाच्या १०० मूर्ती

महानगर सफाई कर्मचारी संघ, शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली २७ गावातील शेकडो कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी केडीएमसी मुख्यालयावर मोर्चा काढला. यावेळी आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी महापालिके विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कल्याण- डोंबिवली महापालिकेलगतची २७ गावे १ जून २०१५ रोजी महापालिकेत समाविष्ट करण्यात आली. या गावातील ग्रामपंचायतीच्या वास्तू महापालिकेत समाविष्ट करण्यात आल्या. मात्र अद्यापही ग्रामपंचायतमधील कामगारांचा प्रश्न प्रलंबित आहे. २७ गावातील कर्मचाऱ्यांना महापालिकेत समाविष्ट करून घेण्याच्या मागणीसाठी नऊ वर्षापासून पाठपुरावा सुरू आहे. मात्र अद्यापही या कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत समाविष्ट करून घेतले नाही. किमान वेतन दिले जात नाही; असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला. 

KDMC News
Beed News : ठाकरे गटाला बीडमध्ये खिंडार; युवा सेना प्रमुख व महिला आघाडी जिल्हाध्यक्षांनी ठोकला रामराम, VIDEO

अशा केल्या मागण्या 

शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी २७ गावातील कामगारांना महापालिकेत कायमस्वरूपी समाविष्ट करा, मृत्यू झालेल्या कामगारांच्या वारसाला महापालिका सेवेत सामावून घ्या, सेवानिवृत्त कामगारांना पेन्शन योजना चालू करा अशा मागण्या केल्या. तसेच मागण्या मान्य न झाल्यास महापालिका अधिकाऱ्यांना घराबाहेर पडून देणार नाही. महापालिकेच्या कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा केडीएमसीला दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com