Manoj Jarange Patil Speech Live Updates:  Saamtv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: मी सांगेल ती गोष्ट तुम्हाला करावीच लागेल; मनोज जरांगेंनी मराठा बांधवांकडून घेतलं वचन

Manoj Jarange Patil Speech Live Updates: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पहिल्यांदाच नारायण गडावर दसरा मेळावा घेत आहेत. या मेळाव्याला लाखोंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित आहेत. यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावरुन राज्य सरकारवर तोफ डागली.

अभिजीत सोनावणे

Manoj Jarange Patil Speech: राज्यात आज पाच दसरा मेळावे पार पडत असल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दरवर्षी शिवसेना ठाकरे गट तसेच शिंदे गटासह बीडच्या भगवान गडावर पंकजा मुंडेंचाही मेळावा असतो. मात्र यंदा मनोज जरांगे पाटील यांच्याही मेळाव्याची भर पडली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पहिल्यांदाच नारायण गडावर दसरा मेळावा घेत आहेत. या मेळाव्याला लाखोंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित आहेत. यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावरुन राज्य सरकारवर तोफ डागली.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

"जमलेल्या विराटा समुदायाच्या चरणी मनापासून नतमस्तक होतो. इतका जनसमुदाय जमेल असं वाटलं नव्हते. नजर पुरेल इथंपर्यंत तुम्ही याल असे मला वाटले नव्हते. बीडच्या पाठीमागे सर्व रस्ते जाम आहेत. जिकडे तिकडे गर्दीच गर्दी आहे. आपण या ताकदीने एकत्र याल, असे कधी वाटले नव्हते. हा जनसमुदाय न्यायाचा आहे. एका दुखाकडून या जनसमुदायाला सुखाकडे जायचे आहे. या समुदायावर संस्कार आहेत. ते संस्कार कधीच जातीवाद करत नाहीत. प्रचंड ताकदीने असणारा हा समुदाय, या राज्यावर समुद्रासारखा पसरलाय. पण मस्तीत वागला नाही.

"या नगद नारायणाने आपल्याला समतेची शिकवण दिली. या गडाची किमया आणि आशीर्वाद ज्याला मिळतो तो दिल्लीसुद्धा वाकवतो. दिल्लीला जाऊन जे उलटले, त्यांना जनतेनं उलटवले. जर अडवणूक होणार असेल तर इच्छा नसतांनाही उठाव करावाच लागेल. का आमच्या वाट्याला अन्याय, आम्ही काय पाप केलं? आमच्या समुदायाच्या वाट्याला फक्त अन्याय आला. आमची चूक काय? कुणीतरी आम्हाला सांगा. माझा समाज राज्य आणि देश पुढे जावा म्हणून झुंजला आहे. तलवार हातात घेवून लढला आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मराठा बांधवांकडून वचन घेतले...

"मी कधीच तुमच्या शब्दाच्या पुढे जाणार नाही. तुमच्याकडून फक्त एकच वचन हवे. राजकारण आणि जातीय या गडावरुन मी बोलणार नाही. तुमच्यापुढे जाणार नाही, आणि तुमच्या हिताशिवाय पुढे जाणार नाही. मी ज्यावेळी तुम्हाला सांगेल त्यावेळी फक्त हट्ट धरु नका, जे सांगेल तेच करायचे आहे. तुम्हाला हट्ट सोडून करावेच लागेल. मग दाखवतो यांना दणका. आपल्या नाकावर टिच्चून जर कोणते निर्णय होणार असतील, तर या राज्यातील समजावर अन्याय होणार असेल तर समाजाची शान वाढवण्यासाठी गाडावेच लागणार आहे," असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lonavala-Khandala Tourism: 'या' विकेंडला मस्त भिजायचंय? लोणावळा-खंडाळ्यातील 'या' धबधब्यांची नाव आताच नोट करा

Shefali Jariwala Property: शेफाली जरीवालाची एकूण संपत्ती किती? वारसदार कोण?

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Sri Krishna Janmbhoomi Mathura: ईदगाह 'वादग्रस्त वास्तू' नाहीये; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Shocking : शेतात गेले ते परत आलेच नाहीत; आधी वडिलांनी स्वतःला संपवलं, त्यांना बघून मुलानंही मृत्यूला कवटाळलं

SCROLL FOR NEXT