Maharashtra Politics: राजे गटाचं ठरलं! संजीवराजेंसह आमदार दीपक चव्हाण 'तुतारी' वाजवणार, रामराजेंचा मात्र वेगळा निर्णय; दादांना धक्का

Maharashtra Assembly Election 2024: फलटणचे संजीवराजे नाईक निंबाळकर, आमदार दिपक चव्हाण हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार आहेत तर स्वतः रामराजे निंबाळकर मात्र कोणाचाही प्रचार करणार नसल्याचे निश्चित झाले आहे.
Maharashtra Politics: राजे गटाचं ठरलं! संजीवराजेंसह आमदार दीपक चव्हाण 'तुतारी' वाजवणार, रामराजेंचा मात्र वेगळा निर्णय; दादांना धक्का
Ramraje Naik NimbalkarSaam Tv
Published On

राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. विधानसभेच्या आधी मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. अशातच लोकसभेपासून महायुतीशी दुरावलेले फलटणचा राजे गट विधानसभेला काय निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. याबाबत आता महत्वाची घडामोड समोर आली असून फलटणचे संजीवराजे नाईक निंबाळकर, आमदार दिपक चव्हाण हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार आहेत तर स्वतः रामराजे निंबाळकर मात्र कोणाचाही प्रचार करणार नसल्याचे निश्चित झाले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, विधानसभा निवडणुकांआधी फलटणच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वीच रामराजे नाईक निंबाळकर यांनी तुतारी हाती घेणार असल्याचे संकेत दिले होते. अखेर याबाबतचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. काल राजे गटाच्या झालेल्या बैठकीत रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधु संजीवराजे नाईक निंबाळकर आणि फलटण कोरेगाव चे विद्यमान आमदार दीपक चव्हाण करणार शरद पवार पक्षात प्रवेश करणार आहेत.

गेल्या दीड वर्षात ज्या पद्धतीने या जिल्ह्यातील विशेष करून माण, फलटण खटाव या तालुक्यातून सत्ता राबवली गेली. त्यामुळे कार्यकर्त्यांना भ्रम होता की सत्तेत जाऊन, महायुतीत जाऊन आपल्याला काय मिळालं त्यामुळे त्याचा हा परिणाम आहे. कार्यकर्त्यांना भोगावे लागत आहे. किती वेळा सांगितलं तरी त्यात काही फरक पडत नाही वरून फोन आले आहेत वरिष्ठांचे फोन आले आहेत असे सांगितले जाते. गेल्या दीड वर्षात फक्त मीच टार्गेट झालो आहे. आमचं भारतीय जनता पार्टीच्या विचारसरणीची भांडण नाही. आम्हाला आमच्या स्थानिक राजकारणात पलीकडे कशाशी देणघेण नाही, असे रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले.

Maharashtra Politics: राजे गटाचं ठरलं! संजीवराजेंसह आमदार दीपक चव्हाण 'तुतारी' वाजवणार, रामराजेंचा मात्र वेगळा निर्णय; दादांना धक्का
Maharashtra Politics : मला विधानसभेचं तिकीट दिलं नाही तर... अजित पवार गटाचा नेता भडकला; महायुतीला दिला कडक इशारा

तसेच रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांची एकूण वागण्याची पद्धत आणि आमच्या घराबद्दल असलेली असूया आहे. त्यांना स्वतःबद्दल प्रचंड अहंकार आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माझ्यावर टीका करण्याची सवय आहे. आज तर ते माझ्या पत्नीबद्दल बोलले. मी तोंड उघडलं तर चालेल का मी तोंड उघडलं तर 16 नाव सांगेन, असा थेट इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Maharashtra Politics: राजे गटाचं ठरलं! संजीवराजेंसह आमदार दीपक चव्हाण 'तुतारी' वाजवणार, रामराजेंचा मात्र वेगळा निर्णय; दादांना धक्का
Raj Thackeray : प्रत्येकाच्या मनातील भाव घरातील व्यक्ती गेल्या सारखाच; राज ठाकरेंनी PM मोदींना पत्र लिहून केली मोठी मागणी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com