Laxman Hake : लक्ष्मण हाके ओबीसी चळवळीतून बाहेर पडणार? सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट

Laxman Hake News : लक्ष्मण हाके यांनी ओबीसी चळवळीतून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. हाके यांच्या सोशल मीडिया पोस्टनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
Laxman Hake
Laxman Hake news Saam tv
Published On

ओबीसी नेते लक्ष्मण हाके लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. हाके यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करून चळवळीतून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. मी ओबीसींच्या बाजूने बोलत गेलो. भांडत गेलो. मात्र, आता शत्रूंची संख्या वाढतेय. पण आता सहन होत नाही.मी लवकरच भूमिका जाहीर करेन, असं हाके म्हणाले आहेत. हाके यांच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण आलं आहे.

ओबीसी नेते लक्ष्मण हाके गेल्या काही महिन्यांपासून ओबीसी आरक्षणासाठी महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. ओबीसीतून मराठा आरक्षणाच्या मागणीला लक्ष्मण हाके यांनी जोरदार विरोध केला. हाके यांच्या भूमिकेला मराठा आंदोलकांच्या विरोधाचा सामना करावा लागला. तर काही दिवसांपूर्वी हाके यांना ओबीसी मेळाव्यातून डावलल्याची चर्चा होती. याचदरम्यान ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या पोस्टची जोरदार चर्चा होत आहे.

Laxman Hake
Rahul Gandhi : तुम्ही घाबरु नका, काँग्रेस तुमच्या सोबत; मामा पगारेंना थेट राहुल गांधींचा फोन, VIDEO

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सोशल मीडियावर पोस्ट म्हटलं की, 'मी प्रामाणिकपणे भांडतोय, ओबीसी भटके एकत्र आले पाहिजेत. आपले हक्क अधिकार टिकले पाहिजेत. मी एक मेंढपाळ धनगराचं पोरगं आहे. मी बॅनर छापू शकत नाही. गाडीला पैसे देऊ शकत नाही, भले मोठे स्टेज लावू शकत नाही. कुणाला चहा पाजू शकत नाही, हे माहित असूनही तुम्ही आजपर्यंत मला साथ दिलीये'.

Laxman Hake
निवडणुकीचं बिगुल वाजलं! माजी मुख्यमंत्र्यांच्या पक्षाची पहिली यादी जाहीर, प्रसिद्ध गायकाला मिळाली उमेदवारी

'उपोषण आंदोलन असो की मोर्चे, एल्गार मेळावे असोत किंवा रॅली, तुम्ही ताकदीने माझ्या पाठीशी उभे राहिलात. मला पाठिंबा देत राहिलात. मी तुमचे आभार मानावेत, तेवढे कमी आहेत. मी ओबीसींच्या बाजूने बोलत गेलो. भांडत गेलो, ओबीसींच्या छोट्या छोट्या जात समूहांना जोडत गेलो. लाखो माणसं जोडली पण शत्रूची संख्या सुद्धा वाढत गेली. हल्ले झाले, झेलले, पण आता सहन होत नाही. उद्या दैत्यानांदूर ता पाथर्डी जि अहिल्यानगरच्या ओबीसी मेळाव्यानंतर मी माझी भूमिका जाहीर करेन. मी आंदोलनात असेन किंवा नसेनही तुम्ही जेवढी साथ दिलीत, त्याबद्दल जाहीर जाहीर आभार मानतो, असे हाके पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com