ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
स्वप्नशास्त्रानुसार, काही स्वप्न शुभ संकेत देतात तर काही स्वप्न अशुभ संकेत देतात.
स्वप्नात कोणत्या गोष्टी खाणं शुभ असते, जाणून घ्या.
स्वप्नामध्ये स्वतःला आवळा खाताना बघण शुभ असतं. याचा अर्थ तुमची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे.
स्वप्नात आलं खाताना पाहण्याचा अर्थ असा की, सुख- समृद्धी आणि सन्मानात वृद्धी होऊ शकते.
स्वप्नात आइसक्रिम खाणं शुभ मानले जाते. याचा अर्थ असा की तुमच्या जीवनात सुख-शांती असेल आणि तुमचे सर्व काम पूर्ण होतील.
स्वप्नात अक्रोड खाण्याचा अर्थ असा की लवकरच तुमच्या घरात आनंदाची बातमी येणार आहे.
स्वप्नात ओवा खाणं शुभ मानले जाते. याचा अर्थ तुमचे आरोग्य सुधारणार आहे आणि धनलाभ देखील होऊ शकतो.