Raj Thackeray Speech: राज्यात आज शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा धडाका पाहायला मिळणार आहे. त्याआधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पॅाडकॅास्टच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बेसावध राहू नका, ही क्रांतीची वेळ आहे. तुमच्या मतांचा अपमान करणाऱ्या, पतारणा करणाऱ्यांचा वेध घ्या, आगामी निवडणुकीत राज्यकर्त्यांना धडा शिकवा, असे आवाहन त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला केले.
"आज दसरा. साडेतीन मुहुर्तांपैकी एक. तुम्हाला सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा. दसरा म्हणलं की आपण सोने लुटतो, एकमेकांना शुभेच्छा देतो. हे दरवर्षी आपण करतो. महाराष्ट्राचे सोने अनेक वर्ष लुटलं जात आहे. आम्ही फक्त एकमेकांना आपट्याची पाने वाटतोय. आपल्या हातात आपट्याची पाने सोडून दुसरं काही राहत नाही आणि बाकीचे सगळं सोने लुटून चाललेत. पण आंमचे दुर्लक्ष, आम्ही कधी स्वतःच्या आयुष्यात तर कधी जातीपातीत मशगुल राहतो," असे राज ठाकरे म्हणाले.
आजचा दसरा खूप महत्वाचा आहे आणि तो निवडणुकीच्या तोंडावर आहे. अशावेळी तुम्ही बेसावध राहून चालणार नाही. तुम्ही बेसावध राहता आणि हे सगळे राजकीय खेळ करत राहतात. या सगळ्यामध्ये महाराष्ट्राची प्रगती कुठे चालली आहे? मला सांगा. नुसते रस्ते, फ्लायओव्हर्स बांधणे म्हणजे प्रगती नसते. म्हणजे आमच्या हातात मोबाईल आला, टीव्ही आला म्हणजे प्रगती नाही. प्रगती समाजाची व्हावी लागते. आपण अजूनही चाचपडत आहोत. मात्र तरीही तुमच्यातला राग मला दिसत नाही, त्याच त्याच लोकांना दरवळी निवडून देता आणि पश्चातापाचा हात कपाळावर मारत राहायचा," अशी खंत यावेळी राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
"पाच वर्ष बोंब मारायची. मतदानाचे शस्त्र हातात आहे ते न वापरता ठेवता आणि निवडणुका संपल्या की बोलत राहता. जात पात बघून देश उभा राहत नाही. सर्वांना हात जोडून विनंती आहे. आजपर्यंत तुम्ही ज्यांना सांभाळलं, जोपासलं ते तुमच्या मताशी प्रतारणा करतात. महाराष्ट्रातल्या तरुणांना, तरुणींना माजी हात जोडून विनंती आहे. या दसऱ्यानंतरच्या निवडणुकीत बेसावध राहू नका, असे आवाहन यावेळी राज ठाकरेंनी केले.
"ही क्रांतीची वेळ आहे. बेसावध राहू नका, ही क्रांतीची, वचपा घेण्याची वेळ आहे, गेली पाच वर्ष तुमच्या मतांची पतारणा केली, अपमान केला. वेड्या वाकड्या युती, आघाड्या करत बसले. आज सगळे बोलतील, एकमेकांची उणी-धुणी काढतील. मात्र यामध्ये तुम्ही कुठे आहात? तुम्ही कुठेच नसणार आहात. जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडावा, असे माझं स्वप्न आहे. असं ते म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.