Manoj Jarange Patil  
महाराष्ट्र

Manoj Jarange: मराठा तरुणांना जरांगेंचं थर्टीफर्स्टनिमित्त आवाहन! कसा साजरा करायचा? स्पष्टच सांगितलं

Manoj Jarange Latest News: मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी देखील मराठा तरुणांना थर्टीफर्स्टनिमित्त आवाहन केलं आहे. 'मराठा तरुणांनी अभ्यास आणि शेतीकाम करून थर्टी फस्ट साजरं करावं, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे.

लक्ष्मण सोळुंके

Manoj Jarange Patil in Jalna:

देशासहित राज्यात नववर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरु आहे. वर्षाचा अखेरचा दिवस अर्थात थर्टी फस्टचा दिवस साजरा करण्यासाठी राज्यभरातील तरुणांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे. राज्यातील हॉटेल, पर्यटनस्थळे, समुद्र किनारे नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. याचदरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी देखील मराठा तरुणांना थर्टीफर्स्टनिमित्त आवाहन केलं आहे. 'मराठा तरुणांनी अभ्यास आणि शेतीकाम करून थर्टी फस्ट साजरं करावं, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे. (Latest Marathi News)

मनोज जरांगे यांनी जालन्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जरांगे यांनी थर्टीफर्स्टनिमित्त मराठा तरुणांना आवाहन केलं आहे. 'मराठ्यांच्या पोरांनी अभ्यास आणि शेतीकाम करून थर्टी फस्ट साजरं करावं. दारू पिऊन दुसऱ्यांचे दुकानं मोठे करणं बंद करावं, असं आवाहन देखील जरांगे यांनी मराठा समाजाच्या तरुणांना केलं.

जरांगे यांची मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया

यावेळी मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणावरही भाष्य केलं. 'गिरीश महाजन आरक्षण देणार आहेत, तर आम्हीही घेणारच आहोत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय सरकारला सुट्टी नाही. आमच्या आंदोलनाला सहज न घेता, गांभीर्याने घ्या, असा टोला जरांगे यांनी गिरीश महाजन यांनी लगावला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जरांगे यांची चंद्रकांत पाटील यांच्यावर प्रतिक्रिया

'मराठा समाजाला आरक्षण मिळायला उशीर होईल,असं सांगून चंद्रकांत पाटील यांनी सरकारच्या मनातलंच सांगितलं. पण आम्ही ते आरक्षण मगितलेलंच नाही. आमची मागणी ही मराठा-कुणबी एकच असल्यानं मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण देण्याची आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. चंद्रकांत पाटील असल्यानंतर नक्कीच पन्नास वर्षे आरक्षणासाठी लागतील, असा टोलाही जरांगे यांनी लगावला आहे.

'चंद्रकांत पाटील आता खरं बोलले आहेत, असंही जरांगे यांनी म्हटलं आहे. आमची विशेष अधिवेशनाची मागणी नाही, आधी सुरू असलेल्या अधिवेशनाची मुदत वाढवा अशी मागणी आम्ही केली होती, असंही जरांगे यांनी स्पष्ट केलं. आमरण उपोषणापेक्षा दुसरं शांततेतील आंदोलन दुसरं कुठलं असेल तर ते सांगा, असा सवाल देखील त्यांनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra: भ्रष्टाचारात महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानावर, तर पुणेकर राज्यात अव्वल, धक्कादायक आकडेवारी

Shocking: धक्कादायक! ३० जणांनी घरात घुसून गोळीबार केला, पोलिसांनी तिघांना अटक केली

Maharashtra Dasara Melava Live Update : मनोज जरांगे पाटील दसरा मेळाव्यासाठी नारायण गडाकडे रवाना

Heart attack: 99% टक्के लोकांना 'या' एका कारणामुळे येतो हार्ट अटॅक; तुम्हीही ही चूक करत नाही ना?

Buldhana : समृद्धी महामार्गावर अवैध गुटख्याची तस्करी; एक कोटी १३ लाखांचा गुटखा जप्त

SCROLL FOR NEXT