साडेबारा कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रात मराठा समाजाचा मागसलेपणाचा डाटा गोळा करायला वेळ लागेल. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आणखी एक वर्षांचा कालावधी लागू शकतो... असे मोठे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. आज (रविवार, ३१ डिसेंबर) मंत्री चंद्रकांत पाटील हे पंढरपूरमध्ये आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
"सध्या साडेबारा कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात तीन कोटी मराठा समाजाची संख्या असल्याने त्याचा डाटा गोळा करायला वेळ लागेल. कदाचित एक वर्ष वेळ लागू शकतो, असा दावा चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला. आधी सर्वेक्षण झाल्याने कमी वेळात ही प्रक्रिया होईल. मराठा मागास असल्याचा अहवाल आल्याशिवाय अधिवेशन बोलवता येणार नसल्याचेही ते म्हणाले.
आरक्षणाला एका वर्षाचा कालावधी..
"प्रत्येक गोष्ट व्हायला वेळ लागतो. २०१४ ते २०१९ काळात मी हा प्रश्न जवळून हाताळला होता. त्यावेळी मागास वर्ग आयोगाला अहवाल द्यायला एका वर्षाचा कालावधी लागला होता. त्यामुळे तो अहवाल हायकोर्टात टिकला. पण सुप्रीम कोर्टात हायकोर्टाप्रमाणे प्रभावीपणे न मांडता आल्याने तो टिकला नाही..." अशी कबुली मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
लोकसभा निवडणूकीवर भाष्य...
"महाराष्ट्रात लोकसभेला (Loksabha Election) महायुतीला किमान ४५ जागा मिळतील. त्या खाली जागा येऊच शकत नाहीत. मी हवेत बोलत नाही. विरोधी गटाला केवळ तीन जागा मिळतील. तेवढ्या तर मिळायला हव्यात. राज्यात एक सायलेंट वोटर आहे. ज्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या योजनांचा फायदा झाल्याचाही दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.