Devendra Fadnavis: म्हणून सेना आणि राष्ट्रवादीसोबत युती केली, फडणवीसांनी सांगितले कारण

Maharashtra Politics: महायुतीमध्ये राज्यात अनेक ठिकाणी वाद होत आहेत. विशेषत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महायुतीबरोबर घेण्याचा निर्णय अनेक भागांत नेते व कार्यकर्त्यांना पसंत पडलेला नाही.
Ajit Pawar and Eknath Shinde Devendra Fadnavis Latest news in Marathi
Ajit Pawar and Eknath Shinde Devendra Fadnavis Latest news in MarathiSAAM TV
Published On

महेश बागल

Political News:

शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पावर गटासोबत भाजपने युती केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यामागचं कारण स्पष्ट केलं आहे. शिवसेनेशी भावनिक तर राष्ट्रवादी काँग्रेसशी धोरणात्मक युती असल्याचे महत्त्वपूर्ण प्रतिपादन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. तसेच पक्षाच्या नेत्यांनी संपत्तीचे प्रदर्शन न करता साधेपणाने राहण्याच्या सूचना शनिवारी प्रदेश पदाधिकारी व नेत्यांना दिल्या आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ajit Pawar and Eknath Shinde Devendra Fadnavis Latest news in Marathi
Nagpur Crime News: गणेशपेठ बसस्थानक परिसरात फळविक्रेत्याची चाकू भोसकून हत्या; नागपूरमधील खळबळजनक घटना

महायुतीमध्ये राज्यात अनेक ठिकाणी वाद होत आहेत. विशेषत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महायुतीबरोबर घेण्याचा निर्णय अनेक भागांत नेते व कार्यकर्त्यांना पसंत पडलेला नाही. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी शिवसेनेशी भावनात्मक तर राष्ट्रवादी काँग्रेसशी धोरणात्मक युती असल्याचे स्पष्ट केले.

पदाधिकाऱ्यांनी जाहीरपणे वाद आणि मतप्रदर्शन करू नये, अशा कानपिचक्या देत नेत्यांकडे भूमिका मांडून आपसातील मतभेद मिटवावेत, असे फडणवीस यांनी नमूद केले. लोकसभा निवडणूक तयारीसाठी भाजप प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्ष यांच्या बैठकीचा समारोप करताना फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. गरीब, शेतकरी, महिला व युवा या चार घटकांवर कार्यकर्त्यांनी लक्ष केंद्रित करावे अशी सूचना केली.

पंतप्रधान मोदी यांनी अनेक योजना सुरू केल्या असून त्यांचा लाभ जनतेला मिळत आहे. राज्य सरकारने ७५ हजार नोकरभरतीची घोषणा केली आहे, ती दीड लाखांपर्यंत जाईल. विविध समाजघटकांतील युवकांसाठी वसतिगृहे सुरू करण्यात आली असून राज्यभरात कौशल्यविकास केंद्रे व रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. नागपुरात नुकतीच १० हजार उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Ajit Pawar and Eknath Shinde Devendra Fadnavis Latest news in Marathi
Ulhasnagar Crime News : मित्रानेच केला घात, उल्हासनगरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com